कॉंग्रेस-वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाणांची घोषणा नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची चर्चा जोरदारपणे सुरू होती. मात्र होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील 13 नगर परिषदा निवडणुकीसाठी कॉंगे्रस आणि वंचितची आघाडी झाल्याची घोषणा कॉंग्रेस-वंचितच्या संयुक्त पत्रकार परिषदेत खा.रविंद्र चव्हाण यांनी केली. या पत्रकार परिषदेला माजी आ.ईश्र्वरराव भोसीकर, कॉंगे्रस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, राजेश पावडे, अनिल मोरे, कॉंगे्रसचे नांदेड शहराध्यक्ष अब्दुल सत्तार,कॉंगे्रस प्रवक्ते मुन्तजिबोद्दीन, वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद, जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, राज्य सचिव शाम कांबळे, इंजि.प्रशांत इंगोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी खा.रविंद्र चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळसाहेब आंबेडकर यांचे अभिनंदन करत त्यांनी ही आघाडी घडवून आणण्याचे सांगितले. सध्या जिल्ह्यात 12 नगर परिषदेसह एका नगर पंचायतीचे निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी कॉंगे्रस आणि वंचितची आघाडी झाली आहे. ही आघाडी समसमान तत्वावर झाली आहे. या आघाडीची वज्रमुळ या निवडणुकीत निश्चितच मोठी होईल आणि ही वज्र मुठ कायम ठेवावी लागेल असा विश्र्वाास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर जनता या आघाडीला निश्चितच कौल देईल. याचबरोबर समविचारी पक्षांना सोबत घेवून आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यावेळी वंचितचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी देखील या आघाडीला दुजारा देत ही आघाडी येणार्या निवडणुकीत निश्चित यश प्राप्त करेल. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीचा अजेंडा मिळता जुळता असून यात राष्ट्रवादी कॉंगे्रस नेते खा.शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसीच्या जागेवर जुन्या ओबीसींनाच न्याय दिला जाईल अशी भुमिका घेतली. हीच भुमिका ऍड. प्रकाश आंबेडकर यांची आहे. यामुळे आम्ही कॉंग्रेससोबत आघाडी केली. वाटाघाटीत ज्या जागा मिळतील त्या ठिकाणी वंचित आणि कॉंग्रेसने जिम्मेदारी घेवून निवडूण आणायच्या आहेत. घात न करता साथ द्यायची आहे. या निवडणूकीत आम्हाला निश्चित यश मिळेल. यानंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत ही आघाडी आमची पुढे कायम ठेवण्यासाठी या निवडणूकीच्या निकालानंतर सर्व अवलंबून आहे यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असतांना म्हणाले. ——- Kanthak Suryatal Post Views: 659 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सीसीटीव्हीच्या निगराणीखाली स्वारातीम विद्यापीठ अंतर्गत हिवाळी – २०२५ परीक्षा सुरू “लाल किल्ल्याजवळ स्फोट! डॉक्टर–इंजिनियरही दहशतीच्या खेळात? पोलिसांच्या जाळ्यात ‘हाय-टेक टेरर नेटवर्क’!”