लोकशाही की दबावशाही? नांदेडमधील पत्रकार परिषदेत घडला नाट्यमय प्रकार

नांदेड (प्रतिनिधी)-लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार वापरताना संयम आणि शिस्त यांचे भान राखणे तितकेच आवश्यक असते. मात्र नांदेडमध्ये आज घडलेल्या एका पत्रकार परिषदेत हा समतोल बिघडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत एका स्वयंघोषित पत्रकार नेत्याच्या भूमिकेमुळे वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले.

आज दुपारी आयोजित या पत्रकार परिषदेसाठी शहरातील विविध प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते. आयोजकांनी सर्वांना निमंत्रित करून व्यवस्थित तयारी केली होती. पत्रकार परिषद सुरू होण्याच्या तयारीत असतानाच, अचानक एक स्वयंघोषित पत्रकार नेता उभा राहिला आणि त्याने आक्रमक भूमिका घेतली. प्रिंट मीडियाला जाहिराती देता, मग इलेक्ट्रॉनिक मीडियाला काय देणार? असा थेट सवाल त्याने आयोजकांना केला.

या प्रश्नावर चर्चा व्हावी, असे सर्वांना वाटत असतानाच, त्या व्यक्तीने पुढे जाऊन पत्रकार परिषदच थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आक्रमक भूमिकेमुळे काही पत्रकार गोंधळले, तर काहींनी त्याचा निषेध करत आपापल्या जागा सोडण्यास नकार दिला. परिणामी काही क्षणांसाठी हॉलमधील वातावरण चांगलेच तापले.

स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहणाऱ्या काही पत्रकारांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली की, ते बातमीसाठी आले आहेत आणि अशा प्रकारच्या दबावाला बळी पडणार नाहीत. त्यामुळे पत्रकार परिषदेचा पूर्ण बहिष्कार पडला नाही. मात्र त्या स्वयंघोषित नेत्याने काही जणांना सोबत घेऊन हॉल रिकामा करण्यास भाग पाडले, हे विशेष.

हॉल सोडल्यानंतरही तो व्यक्ती परिसरातच फिरत राहिला. यामुळे आयोजकांच्या चिंतेत भर पडली. कार्यक्रम सुरळीत पार पाडायचा असल्याने आयोजकांनी पुढाकार घेत त्या व्यक्तीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात जावयाची नाराजी दूर करण्याच्या पद्धतीने त्याला आश्वासन देण्यात आले. त्यानंतर तो पुन्हा हॉलमध्ये परत आला आणि शांतपणे बसला.

पत्रकार परिषद अखेर पार पडली, मात्र कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित पत्रकार आणि आयोजकांमध्ये एकच चर्चा रंगली,अशा प्रकारे दबाव टाकणाऱ्या व्यक्तीच्या बातम्या खरोखरच कुठे प्रकाशित किंवा प्रसारित होतात का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. काहींनी तर उघडपणे नाराजी व्यक्त करत सांगितले की, हा व्यक्ती नेहमीच आयोजकांना अडचणीत टाकतो.

यावेळी काही पत्रकारांनी असेही सांगितले की, बातमी कव्हर करण्यासाठी गावोगावी जावे लागते, त्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत काही जण मात्र आयोजकांकडून विविध प्रकारे फायदे मिळवण्याचा प्रयत्न करतात. पेट्रोल खर्चापासून इतर सुविधांपर्यंत मागण्या केल्या जातात, असेही बोलले जात होते.

याच संदर्भात काहींनी उपरोधिक प्रश्न उपस्थित केला जर प्रत्येकजण अशाच पद्धतीने मागण्या करू लागला, तर प्रिंट मीडियानेही मग आयोजकांकडून विविध गोष्टींची अपेक्षा ठेवावी का? काहींनी तर अलीकडील एका क्लासेसच्या आंदोलनाचा उल्लेख करत, संबंधित व्यक्तीने त्यातूनही मोठा फायदा घेतल्याची चर्चा रंगवली.

या संपूर्ण प्रकारामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे पत्रकारिता ही समाजासाठी जबाबदारीने काम करणारी व्यवस्था आहे भडवेगिरी करण्यासाठी नाही,की काही जणांसाठी दबाव टाकण्याचे साधन बनत चालली आहे? लोकशाहीत प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, परंतु तो अधिकार इतरांना त्रास देण्यासाठी किंवा कार्यक्रम बिघडवण्यासाठी वापरला गेला, तर त्याचा परिणाम संपूर्ण व्यवस्थेवर होतो.

नांदेडमधील या घटनेने पत्रकारितेच्या मूल्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पत्रकार परिषद ही माहिती देण्यासाठी आणि समाजापर्यंत योग्य बातमी पोहोचवण्यासाठी असते. मात्र अशा घटनांमुळे खऱ्या पत्रकारांच्या कामावरही परिणाम होतो.

अखेरीस, लोकशाहीत अधिकार जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच जबाबदारीही महत्त्वाची आहे. कोण कसे वागावे, काय करावे आणि काय टाळावे, याचा विचार प्रत्येकानेच करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकशाही हळूहळू दबावशाही मध्ये बदलण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.भडव्यांनी आता तरी स्वतःला सांभाळून घ्यावे नसता लोकशाही मातीत मिळून जाईल आणी त्याची जबाबदारी त्या भडव्यांवर राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!