नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील भोकर व कंधार तालुक्यात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडून लाखोंचा ऐवज लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिली घटना भोकर येथे 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.05 ते 5.10 वाजण्याच्या दरम्यान बिलालनगर परिसरात घडली. अज्ञात चोरट्यांनी उभ्या असलेल्या एम.एच.-24-एसएस-7668 क्रमांकाच्या कारचे काच फोडून कारमधील सुमारे 8 लाख 10 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी बळवंत तुळशीराम शिखरे (वय 53, रा. बाचोटी, ता. कंधार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 195/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दुसरी घटना कंधार तालुक्यातील मानसपुरी येथे 14 एप्रिल रात्री 11 ते 15 एप्रिल सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चांदीची छत्री, पंजा व सात कडे असा एकूण सुमारे 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी शेख चांद शेख लाल (वय 55, व्यवसाय शेती, रा. मानसपुरी, ता. कंधार) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 101/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोन्ही घटनांचा तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध घेतला जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 728 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बदल्यांचा सुगीकाल : मोदक, एजंट आणि मर्जीच्या जागेची घटनात्मक यात्रा;जनजागृती साठी छोटासा प्रयत्न नांदेड जिल्ह्यासाठी पिवळा इशारा : १७ ते २० एप्रिलदरम्यान उष्मालाट व अवकाळी पावसाची शक्यता