श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रीकी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची 7 लाख 84 हजारांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहात खानावळ व वस्तीगृहाची देखभाल करणाऱ्या व्यक्तीने विद्यार्थ्यांकडून फीस म्हणून पैसे घेवून विद्यार्थ्यांची 7 लाख 83 हजार 566 रुपयांना फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
श्री गुरू गोविंदसिंघजी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्थेमधील सहाय्यक प्रा.डॉ.संदीप भगवानराव मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सन 2018 ते 2023 या दरम्यान कंत्राटी पध्दतीने अविनाश सखाराम टोकलवाड यास संस्थेतील खानावळ व विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाचे कामकाज करण्यासाठी नेमण्यात आले होते. या दरम्यान अविनाश टोकलवाडने विद्यार्थ्यांना फिस स्वरुपात ऑनलाईन व रोखीने पैसे द्यावे लागतात असे सांगून स्वत:चे बॅंक खाते क्रमांक 62140469201 आणि पत्नीच्या नावाचे बॅंक खाते क्रमांक 41010567574 वर पैसे घेवून विद्यार्थ्यांची व संस्थेची फसवणूक केली आहे. यासाठी टोकलवाडने विद्यार्थ्यांना बनावट पावत्या पण दिल्या आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी त्या व्यक्तीविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा क्रमांक 430/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *