नांदेड(प्रतिनिधी)-भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 27 जुलै, शनिवारी कुसूम सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. भोई समाज समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दी पत्रकानुसार भोई समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवार दि.27 जुलै रोजी कुसूम सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शक विठ्ठल कागणे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी भोई समाजातील सर्व विद्यार्थी आणि पालकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष राजूण्णा मामुलवार, श्रीराम डुबूकवाड, बालाजी आडगुलवार, यादव पंदीलवाड, ज्ञानेश्र्वर प्रेमलवार, हरीभाऊ निलावार, माधव गंदलपवाड, संतोष टोकलवार, मुक्तेश्र्वर बटलवाड, अंकुश डुबूकवाड, ज्ञानोबा गंदलवाड, संभाजी निलेवाड यांच्यासह समितीच्या सदस्यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 807 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक भुषण राठोड तीन दिवस पोलीस कोठडीत मुख्याध्यापिकेचे कुटूंबासह जि.प.समोर आमरण उपोषण