नांदेड,(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत नांदेड येथील अल रिझवान इंग्लीश स्कूलची विद्यार्थीनि मुन्जजा अफशीन मुंतजीबोद्दिन हिने ९५.२० टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली आहे. विशेष म्हणजे हिने कोणतीही खासगी शिकवणी लावलेली नव्हती. मुन्जजा अफशीन स्वतःची मेहनत व शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या जोरावर हे यश मिळविले आहे. भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे आणि यू पी एस सी ची तयारी करायची आहे, असे तिने सांगितले. माजी नगरसेवक व दैनिक नांदेड टाईम्स उर्दू चे संपादक मुंतजीबोद्दिन यांची मुन्जजा ही कन्या आहे.तिचे आजोबा फैजुल उलूम हाई स्कूल व ज्युनियर कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्यअध्यापक मुनीरोद्दिन यांनी व नातलगांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले. Kanthak Suryatal Post Views: 911 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation ..अन्यथा नागार्जुना पब्लिक स्कुलची मान्यता काढून घेण्यात येईल वर्तमान पत्र वाटप करणाऱ्या मुलाने दहावी परिक्षेत मिळवले 90.70 टक्के गुण