नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक काळात आपल्या ताब्यात 5 लाख रुपये बाळगणाऱ्या लातूर येथील एका डॉक्टराविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अंमलदार नितीन माधवराव धुळगंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 एप्रिल 2024 रोजी रात्री 10 वाजता डेरला पाटीजवळच्या एसएसटी पॉईंटजवळ तपासणी करत असतांना डॉ.प्रमोद घुगे रा.जुना रेणापुर नाका अंबेजोगाई रोड लातूर यांच्या ताब्यात 5 लाख रुपये रोख रक्कम भेटली. याबद्दल विचारलेले वेध पुरावे ते सादर करू शकले नाहीत म्हणून आता त्यांच्याविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार गुन्हा क्रमांक 651/2024 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मठवाड हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 547 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मरखेल येथे मोबाईल शॉपी फोडली पोलीस बॅन्डस्मन लेखी परिक्षा 2 ऑगस्ट रोजी