नांदेड(प्रतिनिधी)-हिमायतनगर येथे घरफोडून चोरट्यांनी 73 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बालाजी उत्तम पुरी हे छत्रपतीनगर, हिमायतनगर येथे राहतात. दि.16 जून रोजी सकाळी 10 वाजता ते आपल्या कुटूंबासोबत कांडली या गावी गेले होते. 2 दिवसानंतर 18 जून रोजी सकाळी 7 वाजता ते परत आले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा होता. तपासणी केली असता घरातून 3 हजार रुपये किंमतीचा एलईडी, कपाटातील 30 हजार रुपये रोख रक्कम, सोन्याच्या दोन अंगठ्या प्रत्येकी 5 ग्रॅमच्या प्रत्येकी 10 हजार रुपये आणि 25 तोळे चांदीच्या चैन किंमत 10 हजार रुपयांचा असा एकूण 37 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 136/2024 दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार कागणे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 846 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation 20 वर्षीय युवतीने अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली न्यायालयाच्या आदेशानंतर नायगाव पोलीसांनी गुन्हा दाखल केला