नांदेड, – नांदेड मतदार संघातील उभे असलेल्या 23 उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दुसरी खर्च बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही खर्च निरीक्षक उपस्थित होते. आठ उमेदवारांना तफावत व त्रुटीच्या संदर्भात नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. दिनेशकुमार जांगिड तसेच निवडणूक खर्च निरीक्षक मग्पेन भुटीया, उमेदवार व राजकीय पक्ष निवडणूक खर्च सनियंत्रण कक्ष प्रमुख डॉ. जनार्दन पक्वाने यांच्यासह लोकसभा निवडणुकीतील अंतिम 23 उमेदवार आदीची उपस्थिती होती. खर्च विभागाचे प्रमुख डॉ. जनार्दन पक्वाने यांनी दिलेल्या माहितीनुसार 8 उमेदवारांना खर्चातील तफावती व त्रुटींसाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ४८ तासात या तफावती व त्रुटी दूर कराव्या लागणार आहेत. अन्यथा तफावतीचा खर्च उमेदवारांनी मान्य केला असे गृहीत धरून तो उमेदवारांच्या खर्चात समाविष्ठ करण्यात येईल. यासंदर्भातील नोटीस उद्या बजावण्यात येणार आहे. त्यानंतर 48 तासात उमेदवारांना तुटी व तफावती दुरुस्त कराव्या लागणार आहेत. तिसरी बैठक २४ एप्रिल रोजी होणार आहे. Kanthak Suryatal Post Views: 699 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बापुराव पावडे यांचे निधन पहिल्या दिवशी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांचे उत्साहात मतदान ;२१ एप्रिलपर्यंत चालणार प्रक्रिया