नांदेड(प्रतिनिधी)-मरखेल येथे एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 9250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. नागराज शेषराव मुंडगे यांची मरखेल येथे विघ्नहर्ता मोबाईल शॉपी आहे. दि.24 जुलैच्या रात्री 9 ते 25 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या दुकानाखालील विटा काढून आत प्रवेश केला आणि मोबाईल चार्ज, चार्जिंग ऍडपटर, जुने मोबाईल असा 9250 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. या पोलीस प्राथमिकीमध्ये संशयीत म्हणून मरखेल येथील नरसींग दंडेवारचा मुलगा असे नाव लिहिले आहे. मरखेल पोलीसांनी भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा क्रमांक 187/2024 दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक अशोक भंडे यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार शेख हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,011 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूर पोलीसांनी तीन गोवंश जातीची जनावरे पकडली निवडणुक काळात 5 लाख रुपये सापडलेल्या डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल