शिख धर्मात श्री गुरुग्रंथ साहिबजींचे तीन गुरुपर्व साजरे केले जाते. श्री गुरुग्रंथ साहिबजींचा पहिला प्रकाशपर्व, श्री गुरुग्रंथ-साहिबजींचा संपूर्णता दिवस आणि गुरुगद्दी दिवस. श्री गुरुग्रंथ साहिबजी हे शिखांचे एक महान धार्मिक ग्रंथ आहेत. ज्यांना खुद स्वतः गुरु द्वारे लिहिली गेलेली ग्रंथात सर्व धर्मीयांच्या भक्तांची वाणी सामील आहे. जसे भक्त कबीरदासजी, रविदासजी, संत शिरोमणि नामदेवजी आणि पाच वेळेस नमाज अदा करनारे शेख-फरिदजीचे श्लोक ही या ग्रंथात दर्ज आहे. अनेकांना ग्रंथ आणि गुरुग्रंथ साहिबजी वेगवेगळे समजतात, त्यांचा संभ्रम या लेखाद्वारे दूर होण्यास मदत होईल. इतिहासात नोंद आहे. एकदा शिखांचे पहिले गुरु श्री नानकदेवजी, तीन दिवसांसाठी सुलतान येथे काली वेई नदीत अंतर्धान पावले. जेव्हा ते इतक्या दिवसानंतर नदीच्या बाहेर आले, तेव्हा त्यांनी सर्वात आधी मूलमंत्रचा उच्चार केला. गुरुजींना त्यावेळी भाई मरदानाजींनी विचारले की तुम्ही तीन दिवस नदीत कसे राहिलात, तेव्हा गुरुजींनी सांगितलेले की मी हे तीन दिवस सचखंड मध्ये राहून येत आहे. (जसे शिवपुरी, ब्रह्मपुरी) शिखांचे परलोक सचखंड जिथे निरंकारांनी (परमात्मा) मला मूलमंत्र दिला आणि सर्व संसाराला विश्वाला एक परमपिता परमात्माशी जोडण्याची आज्ञा दिली. अशा प्रकारे गुरुनानकदेवजींना ज्ञानाची प्राप्ती झाली, तेव्हापासून गुरुजी वेळोवेळी निरंकारकडून आलेली वाणी आपल्या एका पोथी-मध्ये लिहून ठेवत असत. अश्या प्रकारे त्यांनी जपुजी साहिब, आरती, आसाजीदी-वार आदी वाणींची रचना केली. 1539 इसवी मध्ये जेव्हा गुरु नानकदेवजी आपली सांसारिक यात्रा पूर्ण करून सचखंडला जाऊ लागले, तेव्हा त्यांनी आपली आपली ती बहुमूल्य पोथी आपले उत्तराधिकारी श्री अंगददेवजींना सोपवली. शिखांचे दुसरे गुरु श्री अंगददेवजी आपल्या एका वेगळ्या पोथीमध्ये धुरदर्गा (परमेश्वराच्या दरबारातून आलेली वाणी) लिहून ठेवत असत. ज्योती-ज्योती सामावण्यापूर्वी त्यांनीही तिसरे गुरु श्री अमरदासजी यांना लिहिलेली पोथी आणि श्री गुरु नानक देव जी ची पोथी सोपवली. गुरु अंगददेवजींनी आपल्या पोथीमध्ये एकूण त्रेषष्ठ (63) श्लोक लिहिले होते.गुरु नानकदेवजींची हीच मर्यादा पुढे चालवत, गुरु अमरदासजींनी सुद्धा निरंकारकडून आलेली वाणी आपल्या पोथीत लिहीली आणि शेवटच्या काळात त्यांनी ती पोथी आणि पहिल्या दोन गुरुच्या पोथ्या श्री रामदासजी चौथे गुरु यांना सोपविले. गुरु रामदासजींनी एकूण चारही पोथ्या नंतर श्री गुरु अर्जुन देवजींना देऊन टाकल्या. अशा प्रकारे गुरु अर्जुन देवजी जवळ चार पोथ्या एकत्रित झाल्या. सच्ची वाणी व कच्ची वाणी इतिहास वाचल्यावर कळते की गुरु अर्जुन देवजींच्या काळात सच्ची वाणी आणि कच्ची वाणी पाहायला मिळते. इथे ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की सच्ची वाणी ती आहे जी थेट निरंकार प्रभूनें स्वतः गुरुकडून लिहून घेतली होती. दुसरीकडे कच्ची वाणी ती आहे ज्यात स्वार्थी लोकांनी मोठ्या चलाखीने गुरु नानकदेवजींच्या लिहिलेल्या वाणीत आपली वाणी लिहून टाकली. त्यावेळी पाच गुरुंच्या लिहिलेल्या वाणीचा कोणताही अधिकृत ग्रंथ अस्तित्वात नव्हता ज्यामुळे कोणीही मनुष्य गुरुच्या वाणीत आपली वाणी देखील शामिल करून घेत असत. याचे उदा. असे आहे: एकदा गुरु अर्जुनदेवजींच्या दरबारात एका शिखाव्दारे कच्ची वाणी उच्चारली गेली, गुरु अर्जुनदेवजींनी त्या शिखास तिथेच लगेच थांबवले. असे म्हटले जाते की त्याच दिवसांमध्ये गुरु अर्जुनदेवजींचा भाऊ पृथ्वीचंदचा मुलगा श्री गुरुनानकदेवजींच्या नावाने आपली वाणी लिहित होता. श्री आदिग्रंथसाहिबजींची संपूर्णता या गोष्टीची वार्ता जेव्हा गुरु अर्जुनदेवजींना लागली, तेव्हा त्यांनी विचार केला की अशा प्रकारे सतगुरुच्या वाणीचा निर्णय करणे तर कठीण होऊन जाईल. म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला की खऱ्या वाणीला एका ग्रंथात तयार केले जावे जेणेकरून यात कोणतीही बाहेरची कच्ची वाणी प्रवेश करू शकणार नाही. हे महान कार्य पूर्ण करण्यासाठी गुरु अर्जुनदेवजींनी अमृतसर मधील श्री रामसर स्थानी भाई गुरदासजींना आपल्याजवळ बसवून आपली लिहिलेली वाणी आणि पहिल्या चार गुरुंची लिहिलेली वाणी एका ग्रंथात नोंद करविली. सोबतच गुरुजींनी 15 पंधरा भक्तांची वाणी आणि भाटांची वाणी सुद्धा या ग्रंथात सामील केली कारण ते असे भक्त होते ज्यांनी संपूर्ण मानवतेचा बंधुभाव, शांती, सेवा, नामस्मरणारा संदेश आपल्या वाणी द्वारे दिला. गुरुजींनी भविष्यात होणाऱ्या गुरुच्या वाणी साठी विशेष रूपाने काही अंग (पाने) रिकामी सोडले होते. हा ग्रंथ गुरुजींनी गुरुमुखी भाषेत लिहीला. गुरुजींनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी एकूण तीन वर्ष लागली. जेव्हा इस. 1604 मध्ये हा ग्रंथ संपूर्ण झाला तेव्हा या ग्रंथाला नाव देण्यात आले श्री आदिग्रंथ साहिबजी. श्री आदिगुरु ग्रंथ साहिबजींचा प्रथम प्रकाश उत्सव 1 सप्टेंबर 1604 रोजी या ग्रंथाचा श्री हरिमंदर साहिब मध्ये प्रथम प्रकाश करण्यात आला. त्या दिवशी गुरुजींनी बाबा बुड्ढाजींना मान देत त्यांच्या डोक्यावर हा पावन ग्रंथ सुशोभित केला. आणि स्वतः गुरुजी चवरी ढळत मागे मागे चालत राहिले. त्या वेळी बरेचसे भाविक शब्दकीर्तन करत करत श्री रामसर साहिबहून श्री हरिमंदर साहिब येथे पोहचले, तेथे गुरु अर्जुनदेवजींनी मोठ्या सन्मानाने आदराने श्री गुरुग्रंथ साहिबजींचा प्रकाश केला. आणि गुरुजींनी बाबा बुड्ढाजींना श्री हरिमंदर साहिबचे पहिले हेड-ग्रंथी म्हणून नियुक्त केले. व त्यांना हुकूमनामा घ्यावयास लावले. पहिला हुकूमनामा हा आहे: संता के कारज आप खलोइआ हर कंम करावन आया राम॥ धरत सुहावी ताल सुहावा विच अम्रित जल छाया राम॥ अशा रितीने अमृतसर श्री हरिमंदर साहिब मध्ये श्री आदिग्रंथजींचा प्रकाश मोठ्या थाटामाटात केला गेला, दिवाण सजविण्यांत आला, शब्द-किर्तन झाले. संध्याकाळी रहिरास साहिबजीची समाप्ती झाल्यावर बाबा बुड्ढाजींना गुरुजींनी कोठा साहिब मधील नवीन पलंगावर श्री गुरु ग्रंथजीचे सुखासन करण्यास सांगितले. स्वतः जमिनीवर चादर अंथरून विश्रांती घेत असत. गुरुजी ग्रंथ साहिबजींना उच्च दर्जा देत असत आणि स्वतः सेवक बनून राहत असत. इतिहासान नोंद आहे की श्री आदिग्रंथ साहिबजींच्या प्रकाशानंतर काही वर्षांनी जेव्हा गुरु अर्जुनदेवजी ज्योती-ज्योती समावले, तेव्हा बाबा धीरमलच्या परिवाराने श्री आदिग्रंथावर आपला हक्क सांगून श्री हरिमंदरसाहिबमधून हा ग्रंथ स्वतःच्या घरी करतारपूरला घेऊन गेले, जे जालंधर मध्ये स्थित आहे. श्री गुरु गोबिंदसिंघजींनी श्री गुरु ग्रंथसाहिबजींची रचना केली बाबा धीरमलजी गुरु अर्जुनदेवजींच्या चौथ्या पिढीचे वारस आहेत. या घटनेच्या सुमारे 100 वर्षानंतर श्री गुरु गोबिंद सिंघजींना त्यांचे वडील शिखांचे नववे गुरु श्री तेग बहादूरजींची वाणी श्री आदिग्रंथात समाविष्ट करायची होती, ज्यासाठी त्यांनी आपल्या शिख-सेवकांना धीरमलच्या घरी आदिग्रंथ मागवण्यासाठी पाठवले. परंतु त्यांनी शिखांना तो ग्रंथ देण्यास नकार दिला आणि म्हटले की, त्यांनी जाऊन आपले गुरु गोबिंद सिंघजींना सांगावे की जर त्यांच्यात नऊ गुरुंची ज्योत विराजमान आहे तर त्यांनी स्वतः आपल्या शक्तीने पुन्हा या ग्रंथाची रचना करावी, आमच्याकडे का मागत आहेत? हे सर्व ऐकूण गुरुजींनी साबो की तलवंडी शहरात दमदमा साहिब येथे भाई मनीसिंघजींच्या द्वारा श्री गुरुग्रंथ साहिबजींची रचना करायला सुरवात केली. इथे ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा गुरु अर्जुनदेवजींनी श्री आदिग्रंथाची रचना केली होती तेव्हा त्यांच्याकडे पहिल्या चार गुरुंच्या पोथ्या उपलब्ध होत्या, पण जेव्हा गुरु गोबिंद सिंघजींनी नवीन ग्रंथाची रचना केली तेव्हा त्यांच्याकडे कोणत्याच गुरुची कोणतीही पोथी, कोणताही पुरावा उपलब्ध नव्हता; श्री गुरु गोबिंद सिंघजींनी तरीही आपल्या रूहानी (आत्मीक) शक्तीने निरंकाराची आज्ञा घेऊन सारी वाणी शुरुआतीपासून शेवट पर्यंत भाई मनीसिंघजींकडून एका ग्रंथात लिहून घेतली. या ग्रंथाच्या वाणीत आणि श्री आदिग्रंथात कोणताही फरक नव्हता. जी वाणी श्री आदिग्रंथात गुरु अर्जुनदेवजींनी नोंदवली होती, अगदी तीच वाणी श्री गुरु गोबिंद सिंघजींनी श्री गुरुग्रंथसाहिबजी मध्ये आपल्या शक्तीने लिहून घेतली. गुरुजींनी आपले पिता तेगबहादूरजींचे 59 (एकोणसाठ) शब्द आणि 77 श्लोक या ग्रंथात नोंदवले. अशा प्रकार दमदमा साहिबजीच्या भूमीवर बसून गुरुजींनी बऱ्याच काळानंतर हा ग्रंथ पूर्ण केला, ज्याला नाव देण्यांत आले श्री गुरु ग्रंथ साहिबजी. ज्या ग्रंथाचे आपण सर्व गुरुद्वारामध्ये दर्शन करतो तो ग्रंथ श्री गुरु गोबिंद सिंघजींनी लिहिलेला आहे. गुरु अर्जुन देवजींनी लिहिलेला श्री आदिग्रंथ आजही करतारपुर जिल्ला जालंधर मध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे, ज्यांचे दर्शन दरवर्षी 13 एप्रिल बैसाखीच्या दिवशी संगत (भाविकांना) घडवले जाते. श्री गुरु ग्रंथ साहिबजीमध्ये एकूण सहा गुरुंची वाणी नोंदवलेली आहे, ज्याचे एकूण 1430 अंग (पृष्ठ) आहेत. सन 1705 मध्ये गुरुगोबिंदसिंघजींनी श्री गुरुग्रंथ साहिबजींची संपूर्णता केली, म्हणूनच शिख हा दिवस संपूर्णता दिवसाच्या रुपात दरवर्षी साजरा करतात. तिसरा महान पर्व श्री गुरुग्रंथ साहिबजींचा गुरुगद्दी सोहळा इतिहासान नोंद आहे की 1708 मध्ये गुरुगोबिंदसिंघजी ज्योती-ज्योत समावण्या पूर्वी देहधारी गुरु परंपरा समाप्त करत श्री गुरुग्रंथ साहिबजींच्या पुढे त्यांनी पाच पैसे, एक नारळ आणि एक कृपाण ठेवले आणि मग त्यांच्या पुढे माथा टेकवला, तीन परिक्रमा केल्या. श्री गुरुग्रंथसाहिबजींना शिखांचे त्यांनी अकरावे गुरु घोषित करून सर्व संगतला हुकूम दिला की आतापासून कोणतेही देहधारी गुरु होणार नाहीत, आपणा सर्वांचे गुरु श्री गुरु श्री ग्रंथसाहिबजी असतील दहाही गुरुंची ज्योत श्री गुरुग्रंथ साहिबजी मध्ये विराजमान आहे. आज्ञा भई अकाल की तबै चलायो पंथ ॥ सब सिखन को हुकूम है गुरु मानियो ग्रंथ ॥ गुरु ग्रंथजी मानियो प्रगट गुरां की देह ॥ जो प्रभ को मिल बो चहै खोज शब्द मै लेह ॥ श्री गुरुग्रंथसाहिबजींचा संदेश आहे बाह्य देखावा नव्हे तर अंतःकरणाची शुद्धता महत्वाची आहे. आपण गुरुग्रंथ साहिबजींचा आदर आपल्या शब्दांनीच नव्हे तर आपल्या विचारानी, कृतीने, सेवाभावाने आणि आचरणाने करूया व मानवतेची मुल्ये जपुया. आपण सर्वांचं सौभाग्य आहे की आपण नांदेड सारख्या ऐतिहासिक तपोभूमीत राहतो आहे. नांदेडची भूमी श्री गुरुगोबिंदसिंघजींच्या अंतिम जीवन प्रवासांशी जोडलेली आहे. आज तख्त श्री हजूरसाहिब, नांदेड हे या महान ऐतिहासिक परंपरांचे स्मारक आणि श्रद्धास्थान आहे. म्हणून नांदेड ही केवळ भौगोलिक जागा नाही. ही भूमी शिख इतिहासातील त्या महान निर्णयाची साक्षीदार आहे. अबचलनगर गोबिंद गुरुका ॥ नाम जपत सुख पाईआ राम ॥ मन इच्छे सेई फल पाये ॥ करते आप वसाईआ राम ॥ वाहेगुरू जी का खालसा, वाहेगुरू जी की फतेह – श्रीमती जसबीर कौर अजितसिंघ ग्रंथी मो. नं. 9881841824 Kanthak Suryatal Post Views: 19 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation अर्धापूरमध्ये सुरक्षित बचपन अभियान; न्यायमूर्ती क्षितिजा लोहगावकर यांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद