नांदेड(प्रतिनिधी)-आमदपुरा ता.देगलूर येथे एका घरातून चोरट्यांनी 48 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. चंद्राबाई व्यंकटराव मंदिरलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 17 जुलैच्या रात्री 10 ते 18 जुलैच्या पहाटे 3 वाजेदरम्यान आमदापुर येथील त्यांचे घरफोडून चोरट्यांनी आपल्या अपंग मुलीसाठी त्यांनी ठेवलेले चांदीचे वाळे 69 तोळे वजनाचे ज्याची किंमत 18 हजार रुपये लिहिली आहे. हातातील दंडकडे 25 तोळे वजनाचे त्याची किंमत 7 हजार 500 रुपये लिहिली आहे. चांदीच्या पाटल्या 5 तोळ्याच्या ज्याची किंमत 3 हजार रुपये लिहिली आहे. तसेच कानातील सोन्याच्या दोन काड्या 10 ग्रॅम वजनाच्या ज्याची किंमत 20 हजार रुपये लिहिली आहे असा एकूण 48 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. मरखेल पोलीसांनी चोरी सदरात भारतीय न्याय संहितेनुसार हा गुन्हा दाखल केला असून अत्यंत शिस्तीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदर शेख अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 621 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वाघाळा रस्त्यावर युवकावर जिवघेणा हल्ला 22 वर्षीय युवकाचा खून करणारे तिन मारेकरी नांदेड ग्रामीण पोलीसांच्या ताब्यात