नांदेड(प्रतिनिधी)-17 जुलै रोजी गौतमीनगर बळीरामपूर येथे अमोल रामेश्र्वर लांडगे या 23 वर्षीय युवकाचा खून झाला होता. सलग तिसऱ्या दिवशी हा तिसरा खून होता. योगेश्र्वरांनी या बाबीला गांभीर्याने घेतले आणि 18 जुलैची पहाट उजाडताच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गाठले. त्या ठिकाणी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्यासह सर्वांनी घडणाऱ्या घटनांवर दाखवलेल्या गांभीर्याला नांदेड ग्रामीण पोलीसांनी जलद प्रतिसाद दिला आणि 18 जुलैच्या दुपारी 1.41 वाजता खूना गुन्हा क्रमांक 621 दाखल झाल्यानंतर काही तासातच अमोल लांडगेच्या खून करणाऱ्या आकाश उर्फ मटक्या मल्हारी जोगदंड, दिपक उर्फ गोगल्या सुहास गोडबोले आणि शंतनू नंदकिशोर डेहाणे या तिघांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मठवाड यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 809 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation आमदापुर येथे घरफोडून 48 हजारांची चोरी नांदेडच्या विशेष पोलीस महानिरिक्षकांनी शासनापुढे नांगी टाकली