नांदेड(प्रतिनिधी)-16 जुलै रोजी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच त्याच्या हातातील दोन अंगठ्या काढून घेतल्या आहेत. गोविंद तुळशिराम गंदाफुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.16 जुलैच्या सकाळी 9 वाजता ते आपल्या अजनी शिवारातील शेतात गेले असतांना त्यांच्या शेजारी असलेल्या शेताचे मालक आणि त्यातील त्यांचे सहकारी गोविंद बाबुराव मजगे, दिपक निळकंठ धुंदे, दयानंद निळकंठ धुंदे, निळकंठ धुंदे यांनी फिर्यादी गोविंद गंदाफुले यांच्या जातीविषयक उल्लेख करून तुमच्या जमीनी आम्हाला सोडत्त असे म्ळणून हातातील लोखंडी पंच, लोखंडी रॉड, वेळूच्या काठ्या व लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा सुध्दा प्रयत्न केला. त्यांच्या हातातील दोन अंगठ्या बळजबरीने हिसकावून घेतल्या. उपचारादरम्यान त्यांनी दिलेल्या जबाबानुसार बिलोली पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 109, 118(2), 119(1), 352, 351(2), 351(3), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 163/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास बिलोलीचे पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हनपुड पटील ांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक दिलीप मुंडे हे करणार आहेत. Kanthak Suryatal Post Views: 652 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गनीनगर कॉलनीत 1 लाख 44 हजारांची चोरी सुनेने केली सासुची 17 लाख 86 हजारांची फसवणूक