नांदेड(प्रतिनिधी)-गनी कॉलनी या भागात चोरट्यांनी एका इंजिनिअरचे घरफोडून त्यातून 1 लाख 44 हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा रोख रक्कमेसह ऐवज चोरून नेला आहे.
शिराज अबरारउल्ला खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जुलैच्या दुपारी 3.30 ते 14 जुलैच्या सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांचे बंद असलेले घर चोरट्यांनी कुलूप कोंडा तोडून उघडले आणि घरात असलेल्या सोन्याच्या दोन पाटल्या, किंमत 54 हजार रुपये, गळ्यातील सोन्याच्या चैन किंमत 42 हजार रुपये, 4 थंडीचे बेल्झर 48 हजार रुपये असा एकूण 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला आहे. सोन्याच्या वस्तुंच्या पावत्या उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी या बाबतची तक्रार उशीरा दिली आहे अशी नोंद पोलीस ठाण्यात आहे. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3), 331(4), 305(ए) प्रमाणे गुन्हा क्रमांक 255/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक जोंधळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!