नांदेड(प्रतिनिधी)-तुम्हाला स्कुटीची लॉटरी लागली आहे अशी भुल देवून 48 वर्षीय महिलेला 1 लाख 70 हजार रुपयांचा चुना लावला आहे. सावित्रीबाई श्रीनिवास मारु यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजेच्यासुमारास त्या आपल्या दुकानात सुर्यनगर येथे बसल्या असतांना त्यांच्याकडे एक व्यक्ती आला आणि चॉकलेटच्या डब्यामधील कुपनवर तुम्हाला स्कुटीची लॉटरी लागली आहे असे सांगून त्यासाठी सोन्याचे वस्तु ठेवावे लागतात. असे म्हणाले. माझ्यासोबत चला असे सांगून त्याने मला मोटारसायकलवर बसवून रिलायन्स मॉल कॅनॉल रोड येथे नेले आणि माझ्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोन्याची अंगठी काढून घेतली. या ऐवजाची किंमत 1 लाख 70 हजार रुपये आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा घटना क्रमांक भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) नुसार गुन्हा क्रमांक 326/2024 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक कुकडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 958 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बोधडी शिवारात पुत्राचा खून आईवर जिवघेणा हल्ला मुखेड तालुक्यातील दबडे शिरुर येथे घरफोडले