नांदेड(प्रतिनिधी)-बोधडी शिवारात काम करणाऱ्या आई आणि पुत्रावर हल्ला करून चार अनोळखी माणसांनी पुत्राचा जिव घेतला आहे. आई जखमी आहे. गयाबाई महादेव केंद्रे (60) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बोधडी (बु) ता.किनवट येथे राहतात. त्यांचा मुलगा राम महादेव केंद्रे (38) याला फोन करून शेतात बोलवले. आम्ही दोघे आई आणि मुलगा शेतात गेलो असतांना चार अनोळखी लोकांनी आमच्यावर कुऱ्हाडी आणि दगडांनी हल्ला केला. त्यात मुलगा राम महादेव केंद्रे मरण पावला आहे आणि माझा गळा दाबून मला सुध्दा जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. हा प्रकार दि.13 जुलै 2023 रोजी रात्री 9.30 ते 10 वाजेदरम्यान बोधडी (बु) शिवारात घडला. किनवट पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 203/2024 दाखल केला असून किनवटचे पोलीस निरिक्षक चोपडे अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 727 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दुचाकीवर जाणाऱ्या महिलेचे गंठण तोडले स्कुटीची लॉटरी लागली सांगून भामट्याने महिलेला 1 लाख 70 हजारांचा चुना लावला