नांदेड(प्रतिनिधी)-टिळकनगर रस्त्यावर भरदुपारी दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्या शॉर्ट गंठण 15 ग्रॅमचे, 85 हजार रुपये किंमतीचे दोन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेले आहे. रत्नमाला गजानन काळेवाड या महिला आपली नोकरी संपल्यानंतर आपल्या घरी गितानगरकडे जात असतांना दि.13 जुलैच्या दुपारी 2 वाजेच्यासुमारास तुलसी कंफर्ट हॉटेलच्या पाठीमागील रस्त्यावर टिळकनगर येथे दोन अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकलवर येवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठन बळजबरीने नेले आहे. विमानतळ पोलीसांनी हा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) प्रमाणे गुन्हा क्रमांक 243/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साने हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 785 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation देगलूरमध्ये 2 लाख 7 हजारांची चोरी बोधडी शिवारात पुत्राचा खून आईवर जिवघेणा हल्ला