फायनान्स वसुली अधिकाऱ्याची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-एका फायनान्स वसुली अधिकाऱ्याला थांबवून त्याच्याकडून 31 हजार 613 रुपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी कुपटी (बु) ता.माहुर येथे लुटला आहे.
रामराव केशवराव पुरापडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कुपटी (बु) येथून फायनान्सची वसुली करून दि.11 जुलै रोजी सकाळी 9.45 वाजता करंजीकडे जात असतांना कुपटी रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी लोकांनी त्यांना थांबवून दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांच्या बॅगमधील 28 हजार 613 रुपये रोख रक्कम आणि 2500 रुपये किंमतीची थंम मशीन बळजबरीने चोरून नेली आहे. ईस्लापूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 73/2024 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!