नांदेड(प्रतिनिधी)-एका फायनान्स वसुली अधिकाऱ्याला थांबवून त्याच्याकडून 31 हजार 613 रुपयांचा ऐवज दोन चोरट्यांनी कुपटी (बु) ता.माहुर येथे लुटला आहे. रामराव केशवराव पुरापडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते कुपटी (बु) येथून फायनान्सची वसुली करून दि.11 जुलै रोजी सकाळी 9.45 वाजता करंजीकडे जात असतांना कुपटी रस्त्यावर दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी लोकांनी त्यांना थांबवून दुचाकीला लाथ मारून खाली पाडले आणि त्यांच्या बॅगमधील 28 हजार 613 रुपये रोख रक्कम आणि 2500 रुपये किंमतीची थंम मशीन बळजबरीने चोरून नेली आहे. ईस्लापूर पोलीसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 309(4), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 73/2024 दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपास ईस्लापूरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक भोसले हे करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,335 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भारतीय न्याय संहिता लागू झाल्यानंतरही वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल केला शहाजी उमाप यांच्या आगमनाला कॅटेची स्थगिती