नांदेड(प्रतिनिधी)-खोटे पार्सल आल्याचे सांगून आणि तोतय्या पोलीस बनून सुध्दा 8 लाख 22 हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार शिवाजीनगर पोलीसांनी दाखल केला आहे. विक्रमकुमार पाटणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 जून 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता मोबाईल क्रमांक 9306337692 आणि 9079502777 या दोन क्रमांकावरुन कॉल आले त्यात कोणी विक्रमसिंह बोलत होता. एकाने त्यांना पार्सल आल्याचे खोटे सांगून तसेच तोतय्या पोलीस बनून विक्रमकुमार पाटणीकडून वेगवेगळ्या खात्यांवर 8 लाख 22 हजार रुपये हस्तांतरीत करायला लावून फसवणूक केली आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 218/2024 प्रमाणे दाखल केला असून पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक माने अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 850 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 23 पोलीस उपनिरिक्षकांचे जिल्हा बदल विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा