नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत लाला पेट्रोलपंप येथे 26 जूनच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्या सुमारास तिन अज्ञात दरोडेखोरांनी 2 जणांना लुटून 68 हजार 700 रुपयांचा ऐजव बळजबरीने चोरून नेला आहे. वृषभ ज्ञानेश्र्वर उरपुडे रा. पहुर ता.आर्णी जि.यवतमाळ हे आणि त्यांचे मित्र 26 जून रोजी मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास लाला पेट्रोलपंप हिमायतनगर येथे लघुशंका करण्यासाठी आपल्या गाडीवरून उतरुन खाली थांबले तेंव्हा तिन अनोळखी लोकांनी त्यांच्या समोर येवून लाथाबुक्यांनी मारहाण करून रोख रक्कम, चांदीचे ब्रासलेट, हेडफोन, कानातील बाळ्या असा एकूण 68 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा घटनाक्रम गुन्हा क्रमंाक 204/2024 नुसार नोंदवला असून पोलीस उपनिरिक्षक साने अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 965 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation तोतय्या पोलीस बनुन 8 लाख 22 हजारांना लावला चुना रिंदाच्या नावासह दाखल झालेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींची मुक्तता