नांदेड (प्रतिनिधी) - शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र शिंदे गटाच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी भर पत्रकार परिषदेत फाडल्याच्या कथित प्रकाराचा निषेध करण्यासाठी नांदेडमध्ये ठाकरे सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शायना एनसी हिच्या प्रति रूपाची भररस्त्यातून धिंड काढत शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. त्यानंतर मोर्चा थेट वजीराबाद पोलीस ठाण्यात धडकला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत शायना एनसी यांच्यासह त्यांना पाठबळ देणाऱ्या शिंदे गटाचा निषेध केला. एकनाथ शिंदे भडवा है, शायना एनसी मुर्दाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रतिरूप शायना एनसीची धिंड काढत शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. मोर्चा वजीराबाद पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर शिवसैनिकांनी शायना एनसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. यावेळी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक कुंभार यांना निवेदन व तक्रार सादर केली. गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्राचा कथित अवमान हा शिवसैनिकांच्या भावना दुखावणारा प्रकार असल्याचे सांगत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. या आंदोलनात मुख्य महानगरप्रमुख प्रकाश मारावार, महानगरप्रमुख मनोज यादव, उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे, शहरप्रमुख जितूसिंह टाक, नवज्योतसिंग गाडीवाले, गजानन हरकरे, नितीन सरोदे, विधानसभा प्रमुख विश्वंभर पवार, बाबासाहेब निळेकर, सर्पमित्र अमर कोंडाराज, बंडू देशमुख, निवृत्ती जिंकलवाड, आनंद वाघमारे, करण इटकल, नागेश नवघडे, सूरज फटाले, युवा सेनेचे अशोक पावडे, संजय गिरी, खाजाभाई, गौस भाई, अंकित तेहरा, मनीष झगडे, तुलसीदास नंदाने, आनंद उबाळे, किरण देशमुख, अक्षय रत्नपारखे, राजू यादव, रिजवान शेख, कयूम शेख, संजय येवले, मंगेश यादव, राहुल गंगावणे, तेजस ढाबे, संकेत बुक्तरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. शायना एनसी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठाकरे सेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने या आंदोलनाची नांदेडच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 481 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या खर्चाने मुंबईतील सेमिनार गैरकायदेशीर; सदस्य स. गुरमीत सिंग महाजन यांचा गंभीर आरोप रेल्वे प्रवासात पत्नीच्या पर्समधील २.१८ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला