पूर्णा ते नांदेड प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याचा हात साफ; इतवारा पोलिसांत गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना सुरूच असून, पूर्णा रेल्वे स्थानक ते हैदराबाग इतवारा, नांदेड दरम्यानच्या प्रवासात एका प्रवाशाच्या पत्नीच्या पर्समधील तब्बल २ लाख १८ हजार ६३१ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद शफीक अब्दुल रज्जाक (वय ३९, रा. हैदराबाग इतवारा, नांदेड) हे प्रवास करीत असताना त्यांच्या पत्नीच्या पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पूर्णा रेल्वे स्थानक ते हैदराबाग इतवारा, नांदेड दरम्यानच्या प्रवासात अज्ञात चोरट्याने पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीस गेलेल्या दागिन्यांची किंमत २ लाख १८ हजार ६३१ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मोहम्मद शफीक अब्दुल रज्जाक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोस्टे इतवारा येथे गुन्हा क्रमांक ३८६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीच्या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जावेद करीत आहेत. रेल्वे प्रवासात मौल्यवान दागिने व रोख रक्कम सांभाळण्याबाबत प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. Kanthak Suryatal Post Views: 308 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डुप्लिकेट शायना एनसीची धिंड काढत ठाकरे सेनेचा निषेध मोर्चा; वजीराबाद पोलिसांत तक्रार धक्कादायक! डेहराडूनच्या रस्त्यांवर खाकी विरुद्ध खाकीचा भीषण संग्राम; सीएम हाऊस घेरणाऱ्या PRD जवानांवर पोलिसांचा जोरदार लाठीचार्ज!