प्रा. जयपाल रेड्डी यांच्या तक्रारीची महासंचालक कार्यालयाकडून दखल; तक्रार नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे वर्ग नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलातील कर्मचारी लक्ष्मण अशोक फुलारी यांच्याकडून पोलीस कॉलनी, नांदेड येथील हॉलचा जिम्नास्टिक प्रशिक्षणासाठी होत असलेल्या वापराबाबत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ते प्रा. जयपाल संभाजी रेड्डी यांनी केली आहे. यासंदर्भात प्रा. रेड्डी यांनी पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्याकडे सविस्तर तक्रार निवेदन सादविले असून, त्याची प्रत पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांना दिली आहे. हॉल वाटपाची अधिकृतता तपासण्याची मागणी पोलीस कॉलनीतील संबंधित हॉल कोणत्या आदेशाने, कोणत्या नियमांतर्गत आणि कोणत्या अधिकृत प्रक्रियेद्वारे वापरण्यास देण्यात आला, याची कागदोपत्री चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. हॉल वाटपासाठी परवानगीपत्र, करारनामा, भाडे अथवा शुल्क आकारणीची कागदपत्रे तसेच संबंधित शासकीय फाईल तपासण्यात यावी, असेही म्हटले आहे. ८ ते १० वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी जिम्नास्टिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून शुल्क आकारणी होत असल्यास मागील ८ ते १० वर्षांतील शुल्क वसुली, पावत्या, बँक व्यवहार व इतर आर्थिक नोंदींची तपासणी करण्यात यावी. संबंधित जिम्नास्टिक संस्था किंवा असोसिएशनच्या नोंदणी, मान्यता व परवानगीचीही पडताळणी करावी, अशी मागणी प्रा. रेड्डी यांनी केली आहे. तसेच पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असताना क्रीडा क्षेत्रातील वैयक्तिक अथवा व्यावसायिक उपक्रमासाठी आवश्यक विभागीय परवानगी घेण्यात आली आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील हस्तक्षेपाबाबतही चौकशी क्रीडा क्षेत्रातील इतर संघटना, खेळाडू किंवा पदाधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पोलीस पदाचा गैरवापर झाला आहे का, तसेच धमकी अथवा दबावाच्या तक्रारींमध्ये तथ्य आहे का, याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत आर्थिक व्यवहार किंवा मालमत्तेबाबत विसंगती आढळल्यास, कायद्यानुसार संबंधित सक्षम यंत्रणेकडे माहिती पाठवून आवश्यक चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. महासंचालक कार्यालयाकडून तक्रारीची दखल दरम्यान, या तक्रारीची महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयाकडून दखल घेण्यात आली असून,तक्रार पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पोलीसअधीक्षक, नांदेड यांच्याकडे वर्ग करण्यात आली आहे. महासंचालक कार्यालयाकडून तक्रारदाराला संबंधित युनिटशी संपर्क साधून पुढील पाठपुरावा करण्याचे कळविण्यात आले आहे. ई-मेलद्वारे पाठविलेल्या उत्तरात Please see the forwarded mail. You are requested to take necessary action and inform the complainant/sender accordingly. असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता नांदेड पोलीस प्रशासन या तक्रारीवर कोणती कार्यवाही करते, याकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष लागले आहे. प्रा. जयपाल संभाजी रेड्डी यांनी स्पष्ट केले की, निवेदनातील मुद्दे हे निष्पक्ष चौकशीसाठी उपस्थित केलेले प्रश्न व उपलब्ध माहितीनुसार केलेली तक्रार असून संबंधित व्यक्ती दोषी आहे, असे पूर्वनिर्धारित केलेले नाही. सर्व संबंधित कागदपत्रांची तपासणी करून आणि संबंधितांची बाजू ऐकून स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. Kanthak Suryatal Post Views: 99 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation दिल्लीत लोकशाहीचा महाकॉमेडी शो? २५० खासदारांच्या भीतीपोटी ३ हजार सैनिकांची तटबंदी आणि मागील दाराची सर्कस!