रक्षकच बनले भक्षक! ३-स्टार अधिकाऱ्यांचे संतापजनक कृत्य; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांचा ठिय्या ! दिल्ली (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज वेशीवर टांगले जाणारे धिंडवडे आणि पोलिसांच्या खाकीतली मुजोरी पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यांवर उघडी पडली आहे. जंतर-मंतरवर आंदोलनाचे वृत्तसंकलन करणाऱ्या महिला पत्रकारांवर पोलीस अधिकाऱ्यांनीच हात टाकल्याचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर, न्याय मागण्यासाठी पार्लियामेंट स्ट्रीट (संसद मार्ग) पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांनी थेट ठिय्य आंदोलन सुरू केले आहे. खाकी रक्षकाची की भक्षकाची? असा जळजळीत सवाल विचारत स्वतंत्र पत्रकार आणि सोशल मीडिया रिपोर्टर्सनी दिल्ली पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वर्दीतील गुंडगिरी अन् नराधमशाही: महिला पत्रकारांवर अश्लील भाषेचा प्रयोग जंतर-मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलनाचे कव्हरेज करत असताना वर्दीतील आणि साध्या वेषातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी महिला पत्रकारांचा विवस्त्र विनयभंग केला, त्यांना असभ्य स्पर्श केला आणि अत्यंत अश्लील शब्दांत मानसिक खच्चीकरण केले. ३-स्टार पोलीस अधिकारी विवेक भगत आणि जगदेव काद्यान यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर पीडित महिला पत्रकारांनी थेट नाव घेऊन गंभीर आरोप केले आहेत. केवळ छातीला स्पर्श केला असून पुढे अजून गैरवर्तन करू अशा अत्यंत नीच, विकृत आणि लज्जास्पद भाषेत महिला पत्रकारांचा छळ करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ज्या पोलिसांवर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, तेच पोलीस स्वतःची सगळी विकृती आणि फ्रस्ट्रेशन महिला रिपोर्टर्सवर काढत असल्याचा संतप्त आक्रोश पत्रकारांनी व्यक्त केला. पोलीस ठाणे की भाजप-आरएसएसचे पक्ष कार्यालय? या नराधम पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी जेव्हा पीडित महिला पत्रकार आणि वकील संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहचल्या, तेव्हा त्यांना तब्बल ३ ते ४ तास बाहेरच रोखून धरण्यात आले. सार्वजनिक पोलीस ठाण्याला मोठमोठे बॅरिकेट्स लावून एखाद्या डिटेंशन कॅम्पचे रूप देण्यात आले होते. निर्भया प्रकरणात लढा देणाऱ्या प्रसिद्ध वकील योगिता बयाना यांच्यासह अनेक महिला वकील आणि वरिष्ठ पत्रकारांना तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्याच्या आत जाऊ दिले जात नव्हते. हे सामान्य जनतेचे पोलीस ठाणे राहिलेले नसून भाजप आणि आरएसएसचे कार्यालय बनले आहे, असा खरमरीत आणि बोचरा टोला आंदोलक पत्रकारांनी मारला. तर दुसरीकडे, डीएसपी सचिन शर्मा यांच्या दबावामुळे एफआयआर नोंदवण्यास थेट टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही केला गेला. कोठडीतील अमानुषता: कचऱ्याजवळ डांबले अन् प्राण्यांसारखे अन्न फेकले! एका पीडित आंदोलक तरुणीने पोलिसांच्या क्रूरतेचा बुरखा फाडताना सांगितले की, तिला दुपारी १ वाजेपासून रात्री ८ वाजेपर्यंत बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले होते. कोणत्याही महिला आंदोलकाला किंवा पत्रकाराला नियमबाह्यपणे रात्री ८ वाजेपर्यंत डांबून ठेवणाऱ्या या पोलिसांचा माज एवढ्यावरच थांबला नाही; तर त्यांना शौचालयाच्या आणि कचऱ्याच्या उग्र दुर्गंधीयुक्त जागेजवळ बसवून ठेवण्यात आले. सकाळपासून उपाशी असलेल्या या महिलांना पोलीस कर्मचाऱ्यांनी कचऱ्यात फेकल्यासारखे अन्न फेकून दिले आणि पिण्याच्या पाण्यातही दुर्गंधी येत होती. खाकी वर्दीत लपलेल्या या मानवी प्राण्यांना इतकी साधी माणुसकीही उरलेली नाही का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. गोदी मीडियाची धृतराष्ट्र भूमिका अन् स्वतंत्र पत्रकारांचा एल्गार या संपूर्ण संतापजनक प्रकारात तथाकथित मुख्य प्रवाहातील गोदी मीडियाने आणि बड्या वृत्तवाहिन्यांनी नेहमीप्रमाणेच डोळ्यांवर आणि तोंडावर पट्टी बांधून सोयीस्कर मौन पाळले आहे. मात्र, युट्यूब आणि इन्स्टाग्रामवर काम करणाऱ्या स्वतंत्र पत्रकारांनी या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून पोलिसांच्या मुजोरीला थेट आव्हान दिले आहे. पीआयबी कार्ड दाखवून पत्रकारांची औकात ठरवणाऱ्या आणि सरकारी वरदहस्ताने गुंडगिरी करणाऱ्या पोलिसांना पत्रकारांनी ठणकावून सांगितले की, जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल होत नाही, तोपर्यंत संसद मार्ग सोडून हटणार नाही!. इन्कलाब जिंदाबाद आणि जय भीमच्या जयघोषाने संसद मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर दुमदुमून गेला होता. खाकीचे गुन्हेगार कधी गजाआड होणार? ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सुरू झालेला हा वाद आता पोलिसांच्या गुंडगिरीवर आणि महिला पत्रकारांच्या अस्मितेवर येऊन ठेपला आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा मारणारे दिल्ली पोलीस स्वतःच्याच गुन्हेगार अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात, हेच या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले आहे. आता या मुजोर आणि विकृत अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पोलीस प्रशासन स्वतःच्याच खाकीतील गुन्हेगारांना पाठीशी घालणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Kanthak Suryatal Post Views: 21 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गुजरात लॉबीचा प्लॅन फेल! जंतर-मंतर ते शिवाजी पार्क… शाह-मोदींच्या सत्तेच्या किल्ल्याला बसले सुरुंग!