बीड (प्रतिनिधी)- वृक्ष लागवडीचा निधी वितरित करण्यासाठी आणि इतर प्रशासकीय सहकार्यासाठी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या बीड येथील विभागीय वन अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. श्रीनिवास लिंगान्ना लखमावाड (वय ४०) असे अटक करण्यात आलेल्या लोकसेवकाचे नाव असून, ते विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण, बीड या पदावर कार्यरत आहेत.फिलेल्या लाचेच्या रोख रकमेत ५ लाख खरे चलन आणि उर्वरित खोट्या नोटा समाविष्ठ आहेत. नेमके प्रकरण काय? या प्रकरणातील तक्रारदार हे स्वतः वन परीक्षेत्र अधिकारी आहेत. त्यांच्याकडे असलेल्या वृक्ष लागवड कामाचा निधी वितरित करण्यासाठी, त्यांच्या विरुद्ध असलेल्या निलंबन प्रस्तावाचा पाठपुरावा न करण्यासाठी, प्रलंबित दोन वेतनवाढ देण्यासाठी आणि नर्सरी कामाची चौकशी न करण्यासाठी लखमावाड यांनी एकूण निधीच्या १२% प्रमाणे ४५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात २९ जुलै २०२६ रोजी लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर, त्याच दिवशी लखमावाड यांच्या निवासस्थानी या मागणीची पडताळणी करण्यात आली आणि त्यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. अशी झाली कारवाई: मिळालेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी बीडमधील नगर नाका कॅनॉल रोडवरील ऊर्झा हाईट या लखमावाड यांच्या राहत्या घरी सापळा रचण्यात आला. यावेळी आरोपीने ५ लाख रुपये (खरे चलन) आणि उर्वरित खोट्या नोटा स्वीकारल्यानंतर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सध्या या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनी केली कारवाई: ही धाडसी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत सिनगारे आणि पोलीस उपअधीक्षक प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस निरीक्षक भास्कर नवले, पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब शिंदे, भीमराज जिवडे, अनवेज शेख, प्रकाश डोंगरदिवे आणि चालक ताठे यांचा समावेश होता. नागरिकांना आवाहन: कोणत्याही लोकसेवकाने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाशी (०२४०-२३४४०५०) किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे. Kanthak Suryatal Post Views: 370 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation IPS भाग्यश्री नवटके: प्रामाणिकपणाची किंमतमोजणारी महाराष्ट्राची वाघीण! ११ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त व पोलीस उप अधीक्षक पदी पदोन्नती