मुंबई (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी एका शासन आदेशाद्वारे पोलीस दलातील ११ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि पदस्थापना जाहीर केल्या आहेत. सन २०२५-२६ च्या नियमित निवडसूचीनुसार (भाग-२), पोलीस निरीक्षक संवर्गातील या अधिकाऱ्यांना सहायक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांची नवीन पदस्थापना खालीलप्रमाणे आहे: १. बाळासाहेब नारायण पवार: पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, जालना. २. स्नेहा कृष्णदेव गिरी: पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. ३. स्वाती महादेव गायकवाड: पोलीस उप अधीक्षक, अकोला लोहमार्ग उपविभाग. ४. निर्मला मानसिंग परदेशी: पोलीस उप अधीक्षक, मुख्यालय, धाराशिव. ५. सुनिल गोपीनाथ रोहोकले: उपविभागीय पोलीस अधिकारी, पेठ उपविभाग, नाशिक ग्रामीण. ६. विमल आवडाजी बिडवे: सहायक पोलीस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई. ७. आनंद तिरूनाईक मुदलीयार: सहायक पोलीस आयुक्त, मुंबई शहर. ८. अनंत सिताराम साळुंखे: अपर पोलीस अधीक्षक (ए.ट.प.), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई. ९. सुर्यकांत देवराव कोकणे: पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. १०. तयुब युनूस मुजावर: पोलीस उप अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अमरावती. ११. अनिल हरिभाऊ तनपुरे: सहायक पोलीस आयुक्त, पुणे शहर. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाचे सह सचिव सुग्रिव धपाटे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे. संबंधित सर्व पोलीस आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयांना या आदेशाची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 448 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation बीडमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा मोठा धडाका; ४५ लाखांची लाच मागणाऱ्या विभागीय वन अधिकाऱ्याला अटक पिंपळापूरच्या शोकांतिका नंतर जागे झाले प्रशासन – किशोर तिवारी