जिल्हा युवा पुरस्काराने लवकुश जाधव सन्मानीत

नांदेड – महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यावतीने दिला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्री ना.अतुल सावे यांच्या शुभहस्ते लवकुश मधुकर जाधव यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदरील कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.डॉ.अजित गोपछडे, महापौर कविता संतोष मुळे, आ.बालाजी कल्याणकर, आ.आनंदराव पाटील बोंढारकर, आ.प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलिस अधिक्षक अबिनाशकुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, माजी मंत्री डी.पी.सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर,  माजी आ.ओमप्रकाश पोकर्णा, सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रविण साले, जिल्हा क्रिडा अधिकारी महादेव कसगावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.रत्नदीप गायकवाड, शिरसीकर सर, संजय बेतेवार, संजय चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
लवकुश जाधव यांनी विविध सामाजिक उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. रक्तदान शिबीर, भव्य अन्नदान वाटप, महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शिबीराचे आयोजन, सामाजिक न्याय दिन, महिला सक्षमीकरण, हुंडा विरोधी चळवळ, ऑलंपिक रॅलीचे आयोजन, जनजागृती, युवकांना मार्गदर्शन, हजारो वृक्षांची लागवड यासह अनेक उपक्रम राबविल आहे.
लवकुश जाधव यांना शासनाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा जिल्हा युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल मित्रमंडळी, आप्तस्वकिय, नातेवाईक, अनेक शासकीय अधिकारी यासह सर्वस्तरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!