अजित डोबाळ : राष्ट्रीय सुरक्षेचा चेहरा की युवकांच्या मनात आग लावणारा राजकीय एजंट?
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोबाळ यांचे नाव घेतले जाते. पण मागील अकरा वर्षांचा हिशोब पाहिला तर हा माणूस देशाच्या सुरक्षेचा आधारस्तंभ नसून देशाच्या तरुण पिढीला जाळणारी मशाल ठरत असल्याचे स्पष्ट दिसते.
कंधार अपहरण प्रकरण देश विसरलेला नाही. भारतीय विमानाचे अपहरण झाले, अतिरेकी असर मसूद सोडला गेला आणि त्याला सुरक्षित सोडण्यासाठी स्वतः अजित डोबाळ कंधारला गेले—हा इतिहास आहे. आज तोच माणूस भारताच्या युवकांना सांगतो की “आग पेटवा, इतिहासाचा बदला घ्या.”
पण डोबाळसाहेब,
बदला कोणाकडून?
कशाचा बदला?
आणि का बदला?
या प्रश्नांची उत्तरे देण्याचे धाडस तुम्ही कधीच केले नाही.

युवकांसाठी आग, स्वतःच्या मुलांसाठी परदेशी ऐश
डोबाळ देशातील गरीब, बेरोजगार तरुणांच्या मनात आग पेटवू पाहतात. पण त्यांची स्वतःची दोन मुले विवेक डोबाळ आणि शौर्य डोबाळ परदेशात बसून कोट्यवधींचे धंदे करतात. विवेक डोबाळ भारतीय नागरिकत्व सोडून ब्रिटिश नागरिक झाला आहे. त्याची कंपनी करस्वर्ग देशात नोंदणीकृत आहे. शौर्य डोबाळ सौदी अरेबिया आणि जागतिक भांडवलदारांसोबत व्यवहार करतो, भारतात राहातही नाही.
मग प्रश्न सरळ आहे—
इतिहासाचा बदला घ्यायच्या आगीत तुमची पोरं का नाहीत?
फक्त गरीबांचा मुलगा जळायला हवा का?
कोणत्या इतिहासाचा बदला? की निवडणूकपूर्व विष पेरणी?
डोबाळ इतिहासाचा हवाला देतात—मंदिर लुटले गेले, सभ्यता नष्ट झाली, आम्ही असहाय्य होतो.
पण कोणता इतिहास?
प्राचीन भारतात चक्रवर्ती सम्राट होते.
मध्ययुगात हिंदू राजे एकमेकांची मंदिरे लुटत होते.
हर्षदेवसारख्या हिंदू राजांनी मंदिरलुटीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली होती.
मोगल काळात मराठे, राजपूत, गुर्जर सत्तेत होते.
मग इतिहास इतका सोयीस्करपणे तोडून-मोडून का सांगितला जातो?
कारण सत्य सांगायचे नाही युवकांच्या मेंदूत विष पेरायचे आहे.
बदला घ्यायचा असेल तर कोणावर? सांगा ना!
डोबाळसाहेब,
आज त्या काळातील राजा, नवाब, बादशहा कुठे आहेत?
त्यांच्या कोणत्या पिढीकडून आज बदला घ्यायचा आहे?
आज जिवंत असलेल्या कोणत्या समाजावर तुमची आग ओतायची आहे हे स्पष्ट बोला!
इतिहासाचा बदला घ्यायचा म्हणता—
सैन्य कोणते?
नेतृत्व कोण करणार?
युद्ध कुठे?
अफगाणिस्तानवर हल्ला करणार का?
यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर नाही. कारण हे युद्ध नाही ही राजकीय भडकावू रणनीती आहे.
बेरोजगारीच्या देशात आगीची गरज?
आज भारत जगात सर्वाधिक बेरोजगारी पाहतो आहे.
तरुणांच्या हाताला काम नाही, भविष्य नाही.
पण डोबाळसाहेबांना रोजगार नको त्यांना आग हवी आहे.
का?
कारण पेटलेला युवक प्रश्न विचारत नाही तो फक्त जळतो.
Dog Whistling : हिंसेचा कोडवर्ड
शेवटी डोबाळ म्हणतात, “बदला म्हणजे हिंसा नव्हे.”
हे राजकारणातील सर्वात घाणेरडे तंत्र आहे—Dog Whistling.
ज्यांना हिंसेचा संदेश द्यायचा आहे, त्यांच्यापर्यंत तो पोहोचलेला असतो.
सर्वात अपयशी NSA
अजित डोबाळ यांच्या कार्यकाळात
सर्वाधिक अतिरेकी हल्ले झाले
अंतर्गत सुरक्षा ढासळली
देश कायम भीतीत राहिला
कंधार विमानतळावर अतिरेकी असर मसूदला सोडतानाचा फोटो आजही जिवंत आहे तोच त्यांच्या “राष्ट्रीय सुरक्षेचा” खरा चेहरा आहे.
भारताकडे NSA कायदा आहे.
मग प्रश्न असा आहे—
हा कायदा अजित डोबाळ यांच्यावर कधी लागू होणार?
आज हा प्रश्न सामान्य नागरिक नव्हे, तर पब्लिक इंडियाचे डॉ. राकेश पाठक सुरक्षा तज्ज्ञ आणि माजी अधिकारी उघडपणे विचारत आहेत.
