पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे मोटारसायकल चोरीच्या घटनांचा तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयित रमेश शामराव कयापाक (वय ४०, रा. कुपटी, ता. किनवट, सध्या श्रावस्तीनगर, नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीत आरोपीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पाच तसेच नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल असलेल्या आणखी आठ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपीच्या माहितीनुसार चोरीच्या १३ मोटारसायकलींसह दोन बेवारस मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आणि पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वंजने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक इरफान सय्यद तसेच अंमलदार उमेश आकोसकर, जसपालसिंग काळे, गोरखनाथ काकडे, संजय यमलवाड, गजानन जोगपेटे आणि बालाजी यादगिरवाड यांनी केली. शिवाजीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

