अर्धापूर (प्रतिनिधी) – अर्धापूर पोलिसांनी अवैध गुटखा विक्रेत्यांविरुद्ध धडक कारवाई करत दोन स्वतंत्र प्रकरणांत मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व पानमसाल्याचा साठा जप्त केला. या कारवाईत दोन आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण सुमारे ₹24,375 किमतीचा अवैध गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पहिल्या कारवाईत ७ जुलै रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काशीम कॉलनी, अर्धापूर येथे शेख पप्पू शेख बाले (वय २१, रा. धनगर गल्ली, अर्धापूर) याला त्याच्या टाटा कारमधून विविध कंपन्यांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा ₹9 हजार किमतीचा साठा बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 358/2026 दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत सकाळी ९.४५ वाजता तहसील कार्यालयाजवळ शेख फरदीन शेख (वय २२, रा. इंदिरानगर, अर्धापूर) याला होंडा अॅक्टिव्हा स्कूटीवरून ₹15,375 किमतीचा अवैध पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 357/2026 दाखल करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत संबंधित आरोपींविरुद्ध तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास अर्धापूर पोलीस करीत आहेत. अवैध गुटखा व तंबाखू विक्री करणाऱ्यांविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या दोन आरोपीतांना कोणाचे अभय आहे, हे सुद्धा अर्धापूर पोलिसांनी शोधले ते नक्कीच मोठे मासे या प्रकरणात गुंतलेले असल्याचे उघड होईल असे बोलले जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 639 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation घोरबांडने उस्माननगर येथे किराणा दुकान फोडून रोकडसह साहित्याची चोरी केली शेअर मार्केटमध्ये अधिक नफ्याचे आमिष; नांदेडमधील 59 वर्षीय व्यक्तीची 1.62 लाखांची ऑनलाइन फसवणूक