* देश नेपाळ. मालक जमातीची पोर आणि गुलामांची पोर. एकाच पोट भरलेलं आणि जगणं एकदम ऐशारामी. तर दुसऱ्याच पोट खपाटीला गेलेलं आणि जगन हलाखीच. हा खरे तर जगातील सगळ्या संस्कृतीमधील सनातन मुद्दा.
* देशाचं राजकीय, धार्मिक, मिलिटरी, शैक्षणिक,…, नेतृत्व करतात त्यांची मुलं कशी जगतात व आमची कशी जगतात हे दाखवण्यात येत होतं. ते बदलण्या ऐवजी त्यांनी सोशल मीडिया बंद केला.
* बाकी सोशल मीडियावर बंदी हा अलीकडचा गौण मुद्दा. युरोप मधील रेनीसांस, गांधीजींनी दिलेली चले जाव ची घोषणा, चीनमधील शेतकऱ्यांचा उठाव त्याकाळी कुठे हा सोशल मीडिया होता बरे?
* ही पोर निघाली संसद भवनाकडे. हा भेदभाव कमी करून समता निर्माण करत कल्याणकारी राज्य आणण्याचे अधिकार होते त्यांच्याकडे.
*संसद भवनात कोण होते? ते होते लोकशाहीचा मुखवटा पांघरलेले, स्वतःला मालक जमात मानणारे, पूर्वाश्रमीचे आर्य ब्राह्मण ! ज्यांची लोकसंख्या नेपाळमध्ये 16% आहे ते. आणि स्वतःला शूर म्हणणारे इतर 12%. त्यांच्या पोलिसांनी धडक गोळ्या घातल्या. वीस पंचवीस तरुणांची मढी रस्त्यावर पडली. मग गुलाम जमातीची पोरं, माणसं रस्त्यावर आली आणि नेपाळ पेटलं! त्यात काय काय जळालं ते न वाचलेलं न ऐकलेलं बरं.
*भारतातील चित्र तर त्यापेक्षा भयानक आहे. अमेरिकन अध्यक्षांचे आर्थिक सल्लागार नवारो यांनी नुकतच विधान केलं की तेलाच्या पैशातून मिळणारा नफा भारतातील ब्राह्मण खातात.
* डॉ.सुरज येंगडे या जागतिक पातळीवरील जात या विषयाच्या विद्वाना नुसार या देशातील 50% मालमत्ता इथल्या तीन टक्के ब्राह्मणांकडे आहे.
* इथल्या ब्राह्मणांनी ओबीसी तरुणाला देशाचे पंतप्रधान बनविले आणि लोकशाही संपविली. जाती, जमाती, धर्मामध्ये तेढ वाढवून ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित केले. व नेपाळ सारखेच असंख्य प्रश्न उभे केले.
*ब्राह्मणी सनातनी धर्माच्या नावाखाली इथली लोकशाही बुडवून यांना मनुस्मृति वर आधारित विषमता व शोषण करण्यासाठी समाज व्यवस्था आणावयाची आहे. त्या विरोधी कोणी बोलू ,लिहू, कृती करू नये यासाठी जन सुरक्षा नावाचा भयानक कायदा पास करून घेतला.
* इथल्या मूळ निवासी बहुजन समाजाने कोणताच चिकित्सक विचार करू नये यासाठी त्यांना वैचारिक दृष्ट्या कमकुवत बनवावे, थोडक्यात त्यांनी वैचारिक आत्महत्या करावी म्हणून मंदिरे बांधणे व त्यांना जोडण्यासाठी प्रचंड मोठे रस्ते बांधणे चालू केले आहे.
* त्यांना वाटते या शूद्र मूलनिवासिनींना काही समजत नाही. पण ते आता शहाणे झालेत.त्यांना सगळे दिसते आणि समजते. चोरून दूध पिणाऱ्या बोक्याने डोळे झाकले म्हणजे जगाने डोळे झाकले असा अर्थ होत नाही.
* ब्रह्माच्या तोंडातून जन्मलो, सत्वगुणी,देव योनी, भूतलावरील साक्षात देव आहोत असे मूळनिवासींच्या धर्मग्रंथात घुसडून स्वतःला ब्राह्मण म्हणवून घेणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की आजही तुम्ही ब्राह्मणी व्यवस्था राबवून मूळ निवासींचे शोषण करीत आहात. आणि ते आम्हाला समजत नाही असे तुम्हाला वाटते. चोरून दूध पिणाऱ्या बोक्याने डोळे झाकले म्हणजे जगाने डोळे झाकले असा अर्थ होत नाही. डोळे उघडून बोक्याने भोवताली नाही पाहिले तर हे मूळनिवासी, बहुजन हातामध्ये घटनात्मक लोकशाहीचा सोटा घेऊन बाहेर पडतील!
सुरेश खोपडे
’डोळे मिटून चोरून दूध पिणाऱ्या बोक्यांनो सावधान! मूळ निवासी बहुजन जागा होतोय!!’
