शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदे विरुध्द देवेंद्र फडणवीस या रंगलेल्या सामन्याची मजा घेत दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आपली कामे करून घेत आहेत. एकनाथ शिंदे पुणेपणे अडचणीत आहेत. ठाण्यात असणारे अजय अरशद हे दोन बिल्डर विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यापासून गायब आहेत. या संदर्भाने 30 ते 40 हजार कोटी रुपयांची चर्चा सुरू आहे. सत्य काय हे अजय-अरशदच्या समोर आल्यानंतर कळेल. काही लोक सांगतात ते दुबईमध्ये आहेत. एकंदरीत महायुतीमध्ये काही खुप चांगले चाललेलेे नाही. आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 40-42 आमदार असलेल्या विरोधी पक्ष काय कमाल करतो याकडे लक्ष लागलेले आहे.
विधानसभा निवडणुक 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीने 130 जागा जिंकल्या. त्या जागा कशा जिंकल्या याचा उहापोह वास्तव न्युज लाईव्हने सुध्दा यापुर्वी केलेला आहे. तरी पण अजित पवार यांचे 41 आमदार आणि एकनाथ शिंदे यांचा आमदार मिळून आज महाराष्ट्र विधानसभेत महायुतीचा आकडा 200 पेक्षा जास्त झाला आहे. परंतू दुसऱ्यांदा सत्ता आली तेंव्हा मीच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा एकनाथ शिंदे यांची होती. कारण त्यांना वाटत होते. माझ्या नेतृत्वात निवडणुक लढवली आहे. परंतू भाजपचे 130 आमदार असतांना एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री पदाची संधी मिळणे अवघडच होते. पुर्वीच्या सरकारमध्ये शिवसेना तोडायची होती म्हणून एकनाथ शिंदेचा भार उचलून भारतीय जनता पार्टीने त्यांना मुख्यमंत्री केले आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. मला मुख्यमंत्री पद पाहिजे असे आज एकनाथ शिंदे म्हणत असतील तर त्यांनी हा विचार करायला हवा की, माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस सुध्दा उपमुख्यमंत्री झाले होते. निवडणुकीचा निकाल आल्याबरोबर आपल्या 41 आमदारांसह आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत अशी घोषणा अजित पवार यांनी केली. तेंव्हा भाजप 130 आणि अजित पवार यांचे 41 हा आकडा 171 झाला म्हणजे एकनाथ शिंदे यांची गरजच भाजपला नव्हती. म्हणून ते त्यांचा भार का उचलणार. यात त्यांची चुकही काय? तरी पण एकनाथ शिंदे यांची वागणूक बदली नाही. कोकणात राष्ट्रवादीसोबत ते भांडले, नाशिकमध्ये भारतीय जनता पार्टीसोबत भांडले. परंतू हे दोन्ही पालकमंत्री पद त्यांना मिळाले नाही. एकनाथ शिंदे गृहमंत्री पद मागत होते. ते सुध्दा भारतीय जनता पार्टीने त्यांना दिले नाही. अशा अनेक योजना, अनेक आदेश एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना जारी झाले होते. त्या योजनांना, आदेशांना देवेंद्र फडणवीस यांनी कात्री लावली आहे. केंद्र सरकारचा त्यांना मोठा पाठींबा असल्याने ते पुर्णपणे आपल्या पक्षाचा अजेंडा चालवत आहेत. गमतीची बाब म्हणजे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार असतांना तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आशिर्वादानंतर राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, तहसील स्तरावरील दवाखान्याच्या सफाईचे काम पुढील पाच वर्षासाठी अशा एका कंपनीला दिले ज्यांना सफाई कामाचा अनुभव शुन्य आहे. प्रश्न अनुभवाचा पण नाही. त्यापुर्वी काम करणाऱ्या कंपन्या 70 कोटी रुपये वर्षाच्या दराने हे काम करत होते. म्हणजे पाच वर्षात त्यांना 350 कोटी रुपये मिळत होते त्यात लाच पण आली आणि कंपनीचा फायदा पण आला.पण तानाजी सावंत यांनी हा आलेख दहा पट्टीने जास्त अर्थात 320ं0 कोटी रुपयांमध्ये पाच वर्षासाठी देवून टाकला. देवेंद्र फडणवीस यांनी निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसेच याची चौकशीपण करणार आहेत. 3200 कोटी रुपये एवढी संपत्ती शासनाकडे पण नाही.म्हणून दहा पट वाढलेल्या किंमतीची चौकशी होईल. वाचकांसाठी तानाजी सावंत कोण आहेत. याची आठवण करून देवू इच्छीतो. काही दिवसांपुर्वी तानाजी सावंत यांनी पुणे पोलीसांकडे तक्रार दिली होती की, माझा मुलगा गायब झाला आहे. खरे तर तो मुलगा वडीलांसोबत झालेल्या भांडणानंतर चार्टड फ्लाईटने बॅंकोकाला गेला होता. बॅंकोकाल चार्टड फ्लाईट नेण्यासाठी 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो. एवढा पैसा आहे या तानाजी सावंतकडे. देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराबाबत झिरो टॉलरन्स करणाच म्हणून अनेक कामांना स्थगिती दिली आहे.
दैनिक सामनाने आजच्या आपल्या अंकात गुप्त बैठकीचे वर्णन केले आहे. ते वर्णन खरे असेल तर महायुतीमध्ये गडबड आहे हे नक्कीच. 22फेबु्रवारी 2025 रोजी सकाळी 4 वाजता पुणे येथील कोरेगावमध्ये एका पंचतांरांकित हॉटेलात अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली. त्यावेळी अमित शाहने सांगितले की, शिंदे 4 वाजता आहेत एवढे काय अर्जंट आहे. तेंव्हा शिंदे म्हणाले की, माझा सरकारमध्ये सन्मान नाही. शाह म्हणाले मी देवेंद्रला बोलतो. शिंदे म्हणाले तुमचे मला आश्र्वासन होते की, मला मुख्यमंत्री बनवणार. तेंव्हा शाह म्हणाले असे कसे शक्य आहे. आमचे 130 आमदार असतांना तुम्हाला मुख्यमंत्री कसे बनवणार. हा वृत्तांत आपण समजू की अतिशयोक्ती म्हणून लिहिला आहे. तरी पण एकनाथ शिंदे असवस्थ आहेत हे नक्कीच. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मधील द्वदांचा आनंद अजित पवार घेत आहेत आणि आपली कामे मात्र ते करून घेत आहेत. अशा परिस्थितीत ठाणे मधील अजय- अरशद हे दोन बिल्डर गायब आहेत. त्यांना फंड मॅनेजर असे म्हटले जाते. ठाण्यातील त्यांच्या कार्यालयात प्रति सरकार चालत होते असे ही म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार नाहीत हे जाहीर झाल्याबरोबर ते गायब आहेत. काय लोक सांगतात ते दुबईमध्ये आहेत. कोणी सांगतात अजय-अरशद ते गेले की त्यांना गायब केले. याचे उतर तर ते दोघे समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल. असे चालले आहे महाराष्ट्रात सरकार. महाराष्ट्राच्या जाणत्या रयतेने निवडूण दिलेल्या या सरकारचे भले हो. याच्यापेक्षा जास्त काय लिहावे.
महाराष्ट्र सरकारच्या महायुतीत सर्व काही आनंदात नाही
