नांदेड (प्रतिनिधी) – मराठा पोलीस ठाण्याच्या पथकाने अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अवघ्या काही दिवसांत खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जून रोजी पिंगळी शिवारातील शेतात एका अनोळखी पुरुषाचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मनाठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी दगडू हाके, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मृताची ओळख संतोष अंगद वाघ (रा. पोचर्णा, ता. परभणी) अशी पटली. पुढील तपासात मृत व्यक्तीसोबत संशयित आरोपींनी एका हॉटेलमध्ये मद्यपान व जेवण केल्याचे समोर आले. पोलीसांनी तांत्रिक पुरावे आणि सखोल चौकशीच्या आधारे शंकर कुंडलिक बिरगड (वय २९, रा. कुंडला, ता. वसमत, जि. हिंगोली), विलास लक्ष्मण आवळे (वय २३, रा. टाकळी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि सुरज संभाजी भजने (वय २१, रा. वरडशेवाळा, ता. हदगाव, जि. नांदेड) यांना अटक केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलीसांनी दिली. या प्रकरणात गुन्ह्यात वापरलेले हत्यार, रक्ताचे नमुने, कपडे, मातीचे नमुने, मोबाईल फोन तसेच इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ व ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे. मराठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विलास चवळी,पोलीस अंमलदार अशोक दाढे,शामराव खनपट्टे,अतुल नागरगोजे यांनी गोपनीय माहिती, तांत्रिक मदत आणि सखोल तपासाच्या जोरावर खुनाचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,246 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी कधी? माजी सैनिकाच्या कुटुंबाची ८ वर्षांपासून न्यायासाठी धावपळ बिलोलीतील सहकारी बँकेत 3.22 लाखांचा अपहार; कॅशिअर व शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा