नांदेड (प्रतिनिधी)- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे ज्ञान स्रोत केंद्र आणि ‘सेज जर्नल्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एन्हांसिंग रिसर्च एक्सलन्स विथ ओएनओएस’ (ओएनओएस च्या सहाय्याने संशोधन गुणवत्तेचे संवर्धन )या विषयावर एका विशेष ऑनलाईन लेखक कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. संशोधन क्षेत्रात जागतिक दर्जाची मानके आत्मसात करणे आणि संशोधनाची दृश्यमानता वाढवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. सध्याच्या स्पर्धात्मक युगात उत्कृष्ट संशोधन करण्यासोबतच ते योग्य व्यासपीठावर प्रकाशित करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच उद्देशाने ‘सेज पब्लिकेशन्स’ येथील मुख्य मार्गदर्शक श्री. मनोज गुप्ता (वरिष्ठ व्यवस्थापक – प्रशिक्षण आणि विश्लेषण) यांनी उपस्थित संशोधकांना सखोल मार्गदर्शन केले. मार्गदर्शकांनी ओएनओएस प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर कसा करावा, हस्तलिखित सादर करताना कोणती काळजी घ्यावी आणि जागतिक प्रकाशन मानकांनुसार संशोधनाचा दर्जा कसा उंचवावा, याविषयी महत्त्वपूर्ण तंत्रे आणि प्रात्यक्षिके सादर केली. संशोधनपर लेख का, कसे. कुठे प्रकाशित करावयाचे यावर त्यांनी प्रकाश टाकला. संशोधनपर लेखक कसा लिहावा, वांग्मयचौर्य, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या संदर्भातील प्रश्नांना ही त्यांनी उत्तरे दिली. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांचे मार्गदर्शनात आणि माननीय प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मुख्यउपस्थितीत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ज्ञान स्रोत केंद्राचे प्र. संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. सेज जर्नल्सच्या ग्राहक प्रशिक्षण आणि संवाद समन्वयक शगुन गोयल व रेणू राणा या ही कार्यशाळेस उपस्थित होत्या. विद्यापीठाच्या दूरस्थ शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रकाश निहलानी, क, आय.क्यू.ए.सी. आणि एन.आय.आर.एफ. चे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. उदय दिव्यवीर, डॉ. स्मिता पाटील, डॉ. शिवाजी सोनटक्के, डॉ. सुनिता माने, डॉ. अभिजित पांडे, डॉ. अरुण हंबर्डे यांचेसह अनेक प्राध्यापक, ग्रंथपाल, संशोधक, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. Kanthak Suryatal Post Views: 596 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation स्वारातीमचा विद्यापीठाचा मोठा निर्णय; २४ महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगिती ढाबा मालकाला सहा महिन्यांची शिक्षा, दोघांना परिविक्षाधीन गुन्हेगारी कायद्याचा फायदा