नांदेड(प्रतिनिधी)-कंधार ते कौठा रस्त्यावर असणारे एक एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी त्यातील 4 लाख 34 हजार 400 रुपये चोरल्याचा प्रकार घडला आहे. निता मन्मथ देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 नोव्हेंबर 2024 च्या दुपारी 1 ते सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान त्यांच्या मालकीच्या इमारतीत असलेले एटीएम जे कौठा नांदेड रस्त्यावर आहे ते फोडले. त्यातून 4 लाख 34 हजार 400 रुपये कोणी तरी चोरून नेले आहेत. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 407/2024 नुसार दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक सानप अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 917 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation महिलेची 1 लाख 60 हजारांना ऑनलाईन फसवणूक निवडणुकांच्या विरोधात ईव्हीएम मशीन जाळून लोकस्वराजचे आंदोलन