नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळेला काल रात्री उचलून नेऊन जबर मारहाण करण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्यांची दोन बोटे सुध्दा छाटली आहेत. या हल्याचे कारण फेसबुकवर केलेली पोस्ट आहे असे सांगितले जाते. सध्याच्या युगात समाज माध्यमांवर आपले विषय, आपले मत, मांडणे हे सर्व मान्य आहे. अशाच एका प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केलेल्या एका पोस्टसाठी शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळेला काही लोकांनी काल रात्री उचलून एका गुप्त फार्म हाऊसवर नेले आणि तेथे त्यांना जबर मारहाण करण्यात आली. माहिती सांगणाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी ही मारहाण केलेली आहे. सध्या संतोष वडवळे यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि कायदेशीर प्रक्रिया पुर्ण केली जात आहे. Kanthak Suryatal Post Views: 3,168 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भावजईच्या मारेकरी दीराला पोलीस कोठडी महानगरपालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाची थकबाकी रक्कम देण्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेश