नांदेड(प्रतिनिधी)-आपली भावजई तिच्या भावाला मी त्रास देतो असे फोनवर सांगत असतांना ते संभाषण ऐकून राग आलेल्या दिराने आपल्या भावजईचा खून केला आणि पुतणीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार 30 सप्टेंबरच्या सकाळी 10 वाजेच्यासुमारास मौजे पासदगाव ता.जि.नांदेड येथे घडला. लिंबगाव पोलीसांनी मारेकऱ्याला अटक केल्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या भावजईचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला 3 दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे. एका पुतणीने दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मौजे पासदगाव येथे त्यांची आई पुष्पा कोंडीबा नरवाडे (30) या गहु वेचत असतांना फोनवर आपल्या भावाला सांगत होत्या की, माझा दीर मला त्रास देत आहे. माझ्यासाठी काही तरी काम बघ हे संभाषण ऐकणारा पुष्पा नरवाडेचा दीर गिरीश उर्फ सचिन भगवान नरवाडे (28) याने कुऱ्हाड घेवून भावजईच्या डोक्या आणि इतर ठिकाणी जखमा केल्या.त्यामुळे पुष्पा नरवाडेचा मृत्यू झाला.तसेच आपल्या पुतणीवर कुऱ्हाडीच्या सहाय्याने डाव्या बाजूच्या मानेवर, कानावर, तसेच गालावर मारुन गंभीर जखमी केले. पुतणीचा उपचार सुरू असतांना तिने दिलेल्या जबाबावरून लिंबगाव पोलीसांनी गिरीश उर्फ सचिन भगवान नरवाडे (28) याच्याविरुध्द भारतीय न्याय संचितेच्या कलम 103(1), 109(1), 352 प्रमाणे गुन्हा क्रमांक 145/2024 दाखल केला. या प्रकरणाचा तपास लिंबगावचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एम.एन.दळवे हे करीत आहेत. लिंबगाव पोलीसांनी भावजईचा मारेकरी गिरीष उर्फ सचिन नरवाडेला अटक केली. आज 1 ऑक्टोबर रोजी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने मारेकऱ्याला 3 दिवस अर्थात 4 आक्टोंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,450 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation वृध्द महिलेचा विश्र्वासघात ; 71 हजारांची फसवणूक शिवसेना तालुका उपप्रमुख संतोष वडवळेला भाजपा कार्यकर्त्यांनी केली जबर मारहाण; बोटे छाटल्याचा आरोप