नांदेड(प्रतिनिधी)-राज्यात बऱ्याच न्यायालयाना बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई मेल आल्यानंतर दुपारी 2.45 वाजल्यापासून राज्यातील अनेक न्यायालयामध्ये बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तपासणी करत आहे. अचानकच सुरू झालेल्या तपासणीने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. परंतू पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी अफवांवर विश्र्वास न ठेवता सत्य परिस्थिती आम्ही तपासात आहोत आणि त्यानंतर ती जाहीरपण करणार आहोत असे सांगितले. आज दुपारी 2.45 वाजता एक पोलीस गाडी जागा नसतांना न्यायालयात प्रवेश करत होती. त्यानंतर काही वेळात त्यांनी ध्वनीक्षेपकावर न्यायालयातील पक्षकार, वकील , अधिकारी-कर्मचारी यांनी न्यायालय रिकामे करावे कारण आम्हाला तपासणी करायची आहे असे सांगत होते. काही क्षणातच बॉम्ब शोधक व नाशक पथकातील पोलीस निरिक्षक मिना तोटवार तसेच त्यांचे सर्व कर्मचारी, बॉम्ब शोधणारा श्वान हजर झाले आणि न्यायालयाची तपासणी सुरू झाली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र ब्रम्हे हे सुध्दा न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ आले. पोलीस उपअधिक्षक रामेश्र्वर वैंजने, पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, वजिराबादचे पोलीस निरिक्षक अजित कुंभार तसेच अनेक पोलीस अधिकारी, अनेक पोलीस अंमलदार, जलद प्रतिसाद पथकाचे पोलीस अंमलदार बॉम्बचा शोध घेत आहेत. सत्य परिस्थिती अशीही सांगण्यात येते की, हा ई मेल फक्त नांदेड जिल्ह्याच्या न्यायालयात आला नाही तर हिंगोली, बीड येथेही आला आहे. राज्यभरातील प्रत्येक न्यायालयात ही तपासणी मोहिम सध्या सुरू आहे. पोलीस अधिक्षक डॉ.नीलाभ रोहन यांनी कोणत्याही अफवांवर विश्र्वास करू नका पोलीस आपले काम करत आहेत आणि सर्व तपासणी झाल्यानंतर आम्ही ती जाहीर सुध्दा करणार आहोत असे सांगितले. संबंधित व्हिडीओ ….. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-02-at-15.26.52.mp4 https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/11/WhatsApp-Video-2026-11-02-at-15.26.51.mp4 Kanthak Suryatal Post Views: 400 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation हार-तुऱ्यांऐवजी स्वामी विवेकानंदजींच्या विचारांचा सन्मान!