पोलिस अधीक्षक डॉ. लीला रोहन यांचे शेतकऱ्यांना आवाहन; फायनान्स कंपन्यांकडून त्रास झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधा नांदेड (प्रतिनिधी) – मुदखेड तालुक्यातील माळकवठा येथील शेतकरी चंद्रकांत दगडोजी शिंदे (वय ४०) यांचा मृतदेह नांदेड येथील केएफ एंटरप्रायझेस अर्थात खालसा फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा मृतदेह कार्यालयातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांचे पाय टेबलावर असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणी ज्योती चंद्रकांत शिंदे यांच्या तक्रारीवरून खालसा फायनान्स कंपनीचा मालक मंटू मेजर याच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित दोन व्यक्तींनी गुरुवारी चंद्रकांत शिंदे यांना माळकवठा येथून नांदेडला आणल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम १०३, १४०(१), १४०(२) १४२,१२७(२), ३(५) तसेच इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा क्रमांक ५३३/२०२६ दाखल करण्यात आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच मृत्यूच्या परिस्थितीबाबतचे सत्य तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे करीत आहेत. फायनान्स कंपन्यांकडून त्रास झाल्यास पोलिसांशी संपर्क साधा या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी जनतेसाठी संदेश प्रसारित केला आहे. कोणत्याही व्यक्तीला फायनान्स कंपनीकडून त्रास होत असेल, दबाव टाकला जात असेल किंवा अन्य कोणतीही अडचण निर्माण केली जात असेल, तर त्यांनी न घाबरता तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. फायनान्स कंपन्यांच्या मनमानीला कोणत्याही परिस्थितीत मुभा दिली जाणार नाही. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी भीती न बाळगता आपल्या अडचणी पोलिसांसमोर मांडाव्यात. पोलिसांकडून त्यांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे आश्वासनही पोलीस अधीक्षक डॉ. लीला रोहन यांनी दिले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, मृत्यूचे नेमके कारण आणि कसा मृत्यू झाला या बाबत तपासानंतर अनेक बाबी स्पष्ट होणार आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचा संदेश .. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2026/10/Dr-Nilabh-Rohan.mp4 संबंधित बातमी .. कर्जवसुलीला बोलावले, दोन दिवसांनी मृतदेह लटकलेला! हा आत्महत्येचा फास की व्यवस्थेच्या संशयाचा गुंता? Kanthak Suryatal Post Views: 58 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्जवसुलीला बोलावले, दोन दिवसांनी मृतदेह लटकलेला! हा आत्महत्येचा फास की व्यवस्थेच्या संशयाचा गुंता?