नांदेडमध्ये नवामोंढा परिसरातील घटना; एकाविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – जुन्या वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नवामोंढा, नांदेड येथील फिर्यादीच्या घरासमोरील मोकळ्या आवारात ही घटना घडली. आरोपी हरजी संभाजी राजेगोरे (वय ३५, रा. शेलगाव, ता. अर्धापूर) याने जुन्या वादाच्या कारणावरून त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन जोरात चालवून फिर्यादी कपिल विजयकुमार पोकर्णा (वय ४२, रा. मननपुरा, नवामोंढा, नांदेड) यांना धडक दिली. या धडकेत त्यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०९(१), २१८, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation शेतात जुगाराचा अड्डा, पोलिसांचा सर्जिकल स्ट्राइक; १६ जण जाळ्यात!