नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार बिट जमादार अशोक दाडे याने ताब्यात घेतलेली मोटरसायकल परत देण्यासाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पडताळणीत उघड झाले आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया मनाठा पोलीस ठाण्यात सुरू आहे. घटनेचा सविस्तर तपशील: मनाठा पोलीस ठाणे हद्दीत १२ ऑगस्ट २०२६ रोजी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान २८ वर्षीय पुरुष तक्रारदाराची मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली होती. ही मोटरसायकल परत मिळवून देण्यासाठी मनाठा पोलीस ठाण्यातील बिट जमादार अशोक दाडे वर्ग क याने ५ हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने १३ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड येथे रीतसर तक्रार नोंदवली. एसीबीची पडताळणी व कारवाई: तक्रार प्राप्त झाल्यानंतर १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे १७:३१ वाजण्याच्या सुमारास मनाठा पोलीस ठाण्यात लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान पोलीस अंमलदार अशोक दाडे यांनी ५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वतः स्वीकारण्याची संमती दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी मूळ तक्रारदाराने आरोपीस संशय आला असून ते आता पैशाची मागणी करणार नाहीत असे कळवले. या प्रकरणात आरोपीला अद्याप ताब्यात घेण्यात आलेले नाही किंवा अटक करण्यात आलेली नाही. कारवाई करणारे पथक व मार्गदर्शन: ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उप अधीक्षक राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक रसुल तांबोळी यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले असून पथकात संतोष वच्चेवार, प्रकाश मामुलवार, बालाजी मेकाले व शिवानन रापतवार यांचा समावेश होता. नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन: भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास किंवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास नागरिकांनी खालील नमूद पत्यावर व दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. घटक कार्यालय: नागार्जुन सागर बिल्डिंग, स्नेहनगर, पोलीस कॉलनी, नांदेड – दूरध्वनी: 02462-253512, ईमेल: dysp.acbnanded@mahapolice.gov.in परिक्षेत्र कार्यालय: गेट नंबर १, पोलीस कॉलनी, स्नेहनगर, नांदेड – दूरध्वनी: 02462-255811, ईमेल: spacbnanded@mahapolice.gov.in मुख्यालय टोल फ्री हेल्पलाईन: १०६४ / ०२२-२४९२१२१२ Kanthak Suryatal Post Views: 28 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप उद्या नांदेडमध्ये नागरिकांच्या तक्रारी ऐकणार पत्रकारांवर लाठीहल्ला आणि ४५ मेट्रो बंद; सर्वोच्च न्यायालयात सरकारची कोंडी, संध्याकाळी मोठा फैसला!