नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्यासाठी पोलीस पथकाने परभणी, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात धडाकेबाज कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान मटका व गुटखा विक्रीच्या अवैध धंद्यांवर विशेष लक्ष केंद्रित करत एकूण १० जणांवर कारवाई करण्यात आली असून, दोन्ही कारवाया मिळून सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लातूर आणि परभणीत अवैध मटका अड्ड्यावर धाड

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस पथकाने मटका जुगार अड्ड्यावर धाड टाकली. राधिका लॉज आणि विजयप्रभा बार यांच्या शेजारी असलेल्या पत्र्याच्या दोन शेडमध्ये बेकायदेशीरपणे हा मटका जुगार अड्डा चालवला जात होता. या कारवाईत:

  • जुगाराच्या ठिकाणाहून २१,६०० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.गंगाखेड येथील मटका प्रकरणात भरत दशरथ कोकडवार,राठोड,सूर्यकांत पातलोबा मुरकुटे,शेख करीम शेख दस्तगीर,नंदू तुकाराम राठोड,आबेद अहमद,अफरोज पठाण,जिजाभाऊ धर्माजी कांबळे,कैलास जगतकर यांची मावे आरोपी सदरात आहेत.
  • ७१,००० रुपये किमतीचे ८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले.
  • मटका प्रकरणात एकूण ९२,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लातूर येथील गुटखा प्रकरणात आरोपी सदरात माधव मोरे रा .जांब ता. मुखेड याचे नाव आहे

या प्रकरणी एकूण ९ जणांवर कारवाई करण्यात आली असून, गंगाखेड पोलीस ठाण्यात जुगार कायद्यान्वये (गुन्हा क्र. ६६५/२०२६, कलम १२ (अ)) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लातूरमध्ये बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक रोखली

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० ऑक्टोबर २०२६ रोजी गुटखा तस्करीविरुद्ध दुसरी प्रमुख कारवाई करण्यात आली. काळेगाव मदरसाजवळ संशयित टोयोटा इटिओस कार थांबवून तपासणी केली असता अवैध गुटख्याची साठवणूक व वाहतूक उघडकीस आली. या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे:

  • विक्रीसाठी नेला जाणारा ४,५७,५०० रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला.
  • गुटखा वाहतुकीसाठी वापरलेली ९,५७,५०० रुपयांची टोयोटा इटिओस कार जप्त करण्यात आली.
  • या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील जांब येथील रहिवासी माधव मोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अहमदपूर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

वाळू उपशावर कारवाई

याच मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे महाटी शिवारात अवैध वाळू उपशाविरुद्धही कारवाई करण्यात आली असून, तेथे १० इसमांवर कारवाई करून वाळू व कोट्यवधी रुपयांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

नागरिकांसाठी खबर हेल्पलाईन सुरू

अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ५१ ५० १०० १०० ही ‘ खबर नावाची विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या भागातील अवैध धंद्यांबाबत या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

शहाजी उमाप यांनी केले कौतुक 

डीआयजी पथकातील पोलीस उप निरीक्षक पंकज इंगळे,पोलीस अंमलदार प्रदीप खानसोळे,गणेश राठोड,संदीप वाघाडे,गजानन डवरे यांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!