नांदेड (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे आज (दि.५ ऑक्टोबर) पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजारांने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. उमरी रेल्वे स्टेशन येथे आज (दि.५ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता उमरी (रेल्वे स्टेशन) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. विलासराज भद्रे यांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच अभिनय, दिग्दर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. आंबेडकरी विचारांच्या लेखनातून त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक क्षेत्रात योगदान दिले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ माजी नगरसेवक अरुण भद्रे, पत्नी डॉ. वंदना भद्रे, एक मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 67 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation सत्तेचा माज, खाकीची मुजोरी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गळा आवळण्याचा कट!