नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड मंडलातर्फे 27 ऑगस्ट 2026 रोजी 00:00 ते 23:59 वाजेपर्यंत सघन तिकीट तपासणी (Massive Ticket Checking Drive) राबविण्यात आली. या मोहिमेत मंडलातील सर्व तिकीट तपासणी पथकांनी सक्रिय सहभाग घेतला. ही मोहीम शैलेश कुमार सिंह, सहायक वाणिज्य अधिकारी, नांदेड यांच्या देखरेखीखाली राबविण्यात आली. प्रवाशांनी अधिकृत तिकीटासह प्रवास करावा, विनातिकीट व अनियमित प्रवासाला आळा घालावा तसेच रेल्वेच्या महसुलाचे संरक्षण व योग्य महसूल प्राप्ती सुनिश्चित करणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या मोहिमेत 31 तिकीट तपासणी कर्मचारी आणि 03 RPF कर्मचारी सहभागी झाले. यादरम्यान एकूण 32 गाड्यांची तपासणी करण्यात आली. मोहिमेचे उल्लेखनीय यश सघन तिकीट तपासणीदरम्यान एकूण 943 प्रकरणे आढळून आली असून, त्यातून ₹5,97,000/- इतकी रक्कम वसूल करण्यात आली. ही कामगिरी तिकीट तपासणी पथकांच्या सातत्यपूर्ण आणि समर्पित प्रयत्नांचे द्योतक आहे. प्रकरणांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे: – विनातिकीट प्रवास प्रकरणे: 494 , – भाडे: ₹1,57,295/- – दंड: ₹2,50,515/- -अनियमित प्रवास प्रकरणे 164 , – भाडे: ₹53,980/- , – दंड: ₹82,140/- – अन बुक्ड लगेज प्रकरणे: 285 , – वसूल रक्कम: ₹53,070/- याशिवाय अनधिकृत फेरीविक्रीचे 01 प्रकरण आढळून आले असून, त्यामध्ये ₹2,000/- दंड वसूल करण्यात आला. मोहिमेदरम्यान धूम्रपान निर्माण करण्याचे कोणतेही प्रकरण आढळून आले नाही. रेल्वे प्रवाश्याना आवाहन नांदेड मंडल, दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सर्व प्रवाशांना आवाहन करण्यात येते की, नेहमी वैध तिकीट किंवा अधिकृत प्रवास दस्तऐवजासहच प्रवास करावा Kanthak Suryatal Post Views: 350 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलिसांचे महा-नियोजन: मुख्यालयात ८०० जणांचा पॅकेज, तर वजीराबादमध्ये ७१ पोलिसांवर दुनियेचा भार! पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत