नांदेड (प्रतिनिधी) – शहर व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी घरफोड्या करून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, विदेशी दारू आणि सीसीटीव्ही कॅमेरा असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हडको, नांदेड : २६ ऑगस्ट रोजी रात्री ८ ते २७ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान हडको येथील राजेश्वर पुरुषोत्तम रेवणवाड यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हदगाव : हदगाव येथील मै. वाळकी बु. कयादू बार रेस्टॉरंटमध्ये २६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० दरम्यान चोरट्यांनी मागील दरवाजाने प्रवेश केला. बारमधील विदेशी दारू, रोख रक्कम व सीसीटीव्ही कॅमेरा डीव्हीआर असा ३ लाख ८७ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. याबाबत शिवाजी सखाराम जिंतूरकर यांच्या तक्रारीवरून हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिंदनगर, नांदेड : २६ ऑगस्ट रोजी रात्री ११.३० ते २७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान मिलिंदनगर येथील विठ्ठलाबाई कचरू जाधव यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घर व आस्थापनांना लक्ष्य केले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. Kanthak Suryatal Post Views: 711 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation व्यावसायिक आस्थापनांमध्ये केवळ व्यावसायिक एलपीजी गॅसचा वापर बंधनकारक युवा नेते बंटीभाऊ लांडगे यांना ‘युवा समाजरत्न’ पुरस्कार