नांदेड (प्रतिनिधी) – कर्णकर्कश आवाज करणारे मॉडिफाईड सायलेंसर बसवून तसेच बेदरकारपणे व निष्काळजीपणे दुचाकी चालविणाऱ्या सात दुचाकीस्वारांवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई २५ ऑगस्ट २०२६ रोजी खुदबे नगर चौक परिसरात करण्यात आली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये मॉडिफाईड सायलेंसर वापरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पेट्रोलिंगदरम्यान काही दुचाकीस्वार मॉडिफाईड सायलेंसरमुळे मोठ्या आवाजात वाहने चालविताना तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले. तपासणी केली असता काही वाहनांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही निदर्शनास आले.ही कार्यवाही नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात त्याच्या सहकारी अधिकारी आणि पोलीस अमंलदारानी केली आहे. कारवाईदरम्यान MH 38 AB 8493, MH 26 DU 7738, MH 26 CX 1374, MH 26 AZ 2371, MH 26 5228 तसेच विनाक्रमांकाची लाल रंगाची दुचाकी अशा वाहनांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये नमूद आहे. यातील काही दुचाकीस्वार अल्पवयीन असल्याचेही समोर आले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 1047/2026, भारतीय न्याय संहितेतील कलम 281 व 125 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्णकर्कश आवाज करणारे सायलेंसर बसवून वाहन चालविणे, वाहनांमध्ये अनधिकृत बदल करणे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे टाळावे, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे. अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. Kanthak Suryatal Post Views: 195 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नायगाव तालुक्यातील रातोळी येथे १.२४ लाखांचा अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; ६० वर्षीय आरोपीवर गुन्हा दाखल श्रीराम फायनान्सच्या तगाद्याला कंटाळून २८ वर्षीय युवकाची आत्महत्या; मृत्यूपूर्वी व्हिडिओत गंभीर आरोप