अॅड. संघरत्न गायकवाड यांनी मांडले नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक कार्याचे चित्र
नांदेड (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठक रविवार, दि. 23 ऑगस्ट रोजी नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. बैठकीत राज्यातील संघटनात्मक कामकाज, सामाजिक उपक्रम आणि आगामी कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. संघरत्न गायकवाड यांनी नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक व सामाजिक कार्याचा आढावा मांडला. जिल्ह्यात प्रभागनिहाय कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या असून, नांदेड शहराची स्वतंत्र कार्यकारिणी व कार्यालयीन यंत्रणाही कार्यान्वित असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नांदेड जिल्हाध्यक्ष अॅड. संघरत्न गायकवाड यांनी नांदेड जिल्ह्यातील संघटनात्मक व सामाजिक कार्याचा आढावा मांडला. जिल्ह्यात प्रभागनिहाय कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या असून, नांदेड शहराची स्वतंत्र कार्यकारिणी व कार्यालयीन यंत्रणाही कार्यान्वित असल्याची माहिती त्यांनी दिली.

महात्माज्योतीराव फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त नांदेड शहरात वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप आणि शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील रुग्णांना अन्नदान असे विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष अॅड. गायकवाड यांनी सांगितले. तसेच नागरिकांच्या रेशनसंबंधी अडचणी सोडविण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क साधून पात्र नागरिकांना रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
सामाजिक कार्य करताना समता परिषदेच्या पदाधिकार्यांना प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, अशी मागणी अॅड. गायकवाड यांनी भुजबळ यांच्याकडे केली. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांना याबाबत आवश्यक सूचना देण्याची विनंती त्यांनी केली. नांदेड जिल्ह्यात संघटनेची व्याप्ती वाढवून महात्मा फुले यांच्या समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीच्या व्यासपीठावर आमदार पंकज भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, डॉ. कैलास कमोद, ईश्वर बाळबुधे, अॅड. राजेंद्र महाडोळे, प्रा. सत्संग मुंडे, अॅड. मंगेश ससाणे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, सदानंद मंडलिक, गुफरान शब्बीर अन्सारी, डॉ. नागेश गवळी, डॉ. स्नेहा सोनकाटे, प्रा. दिवाकर गमे, शंकरराव लिंगे, सुनील मेटे, मंजिरी धाडगे, माया इरतकर, प्रा. संतोष वीरकर, समाधान जेजुरकर, रविंद्र खरात व अॅड. सुभाष राऊत यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील समता परिषदेचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
