हिमायतनगर/नांदेड (प्रतिनिधी) – बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत असताना चोरट्यांनी त्याचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या दोन स्वतंत्र घटना हिमायतनगर आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
हिमायतनगर येथील घटनेत महिलेच्या पर्समधून सोन्याची पोत चोरी
हिमायतनगर बसस्थानक येथे २३ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार महिला आणि तिची आई उमरखेड बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका संशयिताने महिलेच्या पर्समधील सोन्याची पोत लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संशयित आरोपी अर्जुन पिटलेवाड रा. मंगरूळ, ता. हिमायतनगर, ह. मु. अन्सापूर, ता. जि. निर्मल यास चोरी करताना आरडाओरड झाल्याने नागरिकांनी पकडले. या प्रकरणी शांता बाई पुंडलिक वानखेडे (वय ४५, रा. उमरखेड, जि. यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस नाईक जाधव करीत आहेत.
नांदेड बसस्थानकात ६० हजारांची सोन्याची मंगळसूत्र चोरी
दुसरी घटना नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेदोनच्या सुमारास घडली. तक्रारदार महिला मुखेड बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलेने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. या मंगळसूत्राची किंमत तब्बल ६० हजार ३७५ रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी कोंडाबाई निळकंठ शिनगारे (वय ६५, रा. आंजनी, ता. बिलोली) यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२७/२०२६ नुसार बीएनएस कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोहेकॉ आडे करीत आहेत.बसस्थानकांवरील गर्दीचा फायदा घेत महिलांच्या दागिन्यांना लक्ष्य करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, प्रवाशांनीही बसमध्ये चढताना व उतरताना मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.